शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शेगाव येथे अपघातात वृद्ध महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:50 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जत : शेगाव (ता. जत) येथे जत ते सांगोला रस्त्यावर कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : शेगाव (ता. जत) येथे जत ते सांगोला रस्त्यावर कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात सुगराबी इस्माईल मुजावर (वय ६० रा. शेगाव, ता. जत) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्यादरम्यान शेगावजवळ घडली. याप्रकरणी शिराज इस्माईल मुजावर यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

सुगराबी मुजावर या शेगाव गावालगत असलेल्या साईनगर येथील मुलीकडे गेल्या होत्या. तेथून परत येत असताना त्यांना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने (क्र. एमएच १४. जी. डी. ८७१९) जोरदार धडक दिली. यावेळी कंटेनरचे पुढील चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात घडल्यानंतर कंटेनरचालक किरण भिकाजी भगत (वय ४३, रा. देहूगाव, ता. हावेली) हा कंटेनर तेथेच सोडून भीतीपोटी पलायन करत होता. परंतु स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले. या घटनेची माहिती जत पोलिसांना देऊन पोलीस आल्यानंतर कंटेनरचालकाला त्यांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बजरंग थोरात करत आहेत.