स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या नगराध्यक्षा नीता देसाई यांची निवड झाली. स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष काँग्रेसचे राजू जाधव, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी साजिद पाटील, पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापतीपदी सागर सूर्यवंशी आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या अश्विनी वेेेल्हाळ-परदेशी यांची निवड झाली. सर्व निवडी बिनविरोध झाल्या.
यावेळी पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गणेश मरकड, तर सहायक पीठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी काम पाहिले. नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने दहा जागा जिंकून सत्ता मिळवली, तर विरोधी भाजपला सात जागा मिळाल्या होत्या. मागीलवर्षी नगराध्यक्षपदाचे सर्वसामान्य महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर नीता देसाई यांची नगराध्यक्षपदी, तर उपनगराध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची निवड करण्यात आली होती.
काँग्रेसचे गटनेते दिनकर जाधव, विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख, नगरसेवक सुनील पवार, श्रीरंग माळी, नितीन शिंदे, मारुती माळी, नगरसेविका आकांक्षा जाधव, रिजवाना मुल्ला उपस्थित होत्या.