यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड म्हणाले, संस्थेने आजवर कामगारांच्या दृष्टीने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. कर्जमर्यादेत वाढ केली आहे, नवनवीन तंत्रज्ञान वापरून प्रशासकीय खर्च कमी केला जात आहे. याद्वारे संस्थेची उन्नती साधली जात आहे. तरी नवीन पदाधिकारी यांनी मागील केलेल्या कामांची माहिती घेऊन पुढे काम करावे आणि संस्थेची प्रगती करावी. यावेळी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थी आकांशा भोसले, पार्थ यादव, दिशा पाटील, हर्षल चव्हाण, उत्कर्षा थोरबोले, प्रियांका आवटे, प्रथमेश लाड, अदिती यादव या गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, वसंत लाड, संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वास लाड, विजय लाड,
संतोष साळुंखे, अनिल जाधव, सुजित पाटील, माजी उपाध्यक्ष अजित घाटगे, नागनाथ पाटील, राहुल जाधव, बी. डी. माने, सचिव संभाजी पवार यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
फोटो : २२ मनोज लाड व २२ कृष्णा माने