शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
2
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
3
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
4
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
5
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
6
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
7
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
8
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
9
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
10
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
11
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
12
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
13
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
14
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
15
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
16
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
17
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
18
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
19
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

आमदारकी वाचली, पण..; सांगली जिल्ह्यातील उमेदवारांच्या मतांच्या आकड्यांचे अजब गणित..जाणून घ्या

By अविनाश कोळी | Published: November 28, 2024 5:52 PM

सांगली, शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ येथील निकालांमधील आकडेवारी रंजक

अविनाश कोळीसांगली : आकडे बऱ्याच गोष्टी स्पष्ट करतात; पण आकडे अनाकलनीय गणितही मांडतात. विधानसभा निवडणूक निकालाने असेच अजब आकडे पुढे आणले आहेत. काही आमदारांना मागील निवडणुकीएवढीच मतांची टक्केवारी मिळूनही ते मोठ्या विजयापर्यंत पोहोचले, तर काहींना तितक्याच मतात पराभव स्वीकारावा लागला. काही आमदारांना विजय मिळूनही मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण सहन करावी लागली.जिल्ह्यातील आठही मतदारसंघात यंदा धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. या निवडणुकीत चार आमदार विजयी, दोन पराभूत तर दोघा माजी आमदारांच्या वारसदारांना विजय मिळाला. ज्यांची आमदारकी वाचली त्यांच्या मतांच्या टक्केवारीची मागील निवडणुकीतील आकड्यांशी तुलना केल्यानंतर अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. सांगली, शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ येथील निकालांमधील आकडेवारी रंजक आहे.

टक्केवारीत वाढ न होता गाडगीळांचा मोठा विजय२०१९च्या निवडणुकीत सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना ४९.६३ टक्के मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांना ४९.७६ टक्के मते मिळाली. तरीही त्यांनी ३६ हजार १३५ मतांनी विजय मिळविला. काँग्रेसमधील मतांच्या विभाजनाचा त्यांना लाभ मिळाल्याचे दिसून येते.

टक्केवारीत घट न होता मानसिंगराव नाईक पराभूतशिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना २०१९ मध्ये ४४.४६ टक्के मतांत विजय प्राप्त झाला होता. यंदा त्यांना ४४.३१ टक्के इतकी म्हणजे जवळपास तितकीच मते मिळूनही त्यांच्या पदरात पराभव पत्करावा लागला. याचे कारण म्हणजे २०१९ मध्ये सम्राट महाडिक यांना मिळालेली २० टक्के मते भाजप उमेदवाराच्या पदरात पडली.

आमदारकी वाचली त्यांची टक्केवारीआमदार  - २०१९ - २०२४ - फरक

  • विश्वजित कदम - ८३.०४ - ५५.८८ - २७.५६
  • सुधीर गाडगीळ - ४९.६३ - ४९.७६ - ०.१३
  • जयंत पाटील - ५७.७८ - ५१.७२ - ६.०६
  • सुरेश खाडे - ५३.५७ - ५६.७ - ३.१३

वारसदारांची कामगिरी कशी?

  • तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार रोहित पाटील यांना या निवडणुकीत ५४.०९ टक्के मते मिळाली. मात्र, त्यांच्या आई माजी आमदार सुमनताई पाटील यांना २०१९च्या निवडणुकीत ६३.७८ टक्के मते मिळाली होती. तुलनेत त्यांना ९.६९ टक्के मते कमी मिळाली.
  • खानापूर मतदारसंघात २०१९ मध्ये दिवंगत शिंदेसेनेचे नेते अनिल बाबर यांना ५३.९४ टक्के मते मिळाली होती. त्यांच्यापेक्षा ७.२ टक्के अधिक म्हणजेच ६१.१४ टक्के मते मिळवित मोठा विजय नोंदविला.

विक्रम सावंत यांच्या मतांमध्ये १४ टक्क्यांनी घटकाँग्रेसचे जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांना भाजपमधील बंडखोरीचा फायदा झाला नाही. याउलट त्यांच्या मतांच्या टक्केवारीत २०१९च्या तुलनेत १४.२६ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीislampur-acइस्लामपूरtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळpalus-kadegaon-acपलूस कडेगावshirala-acशिराळाVotingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024