लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या स्थायी समिती सभापतिपदी सुनीता निकम, शिक्षण नियोजन व बांधकाम समिती सभापतिपदी प्रतिभा पवार, स्वच्छता वैद्यक, सार्वजनिक आरोग्य व दिवाबत्ती समिती सभापतिपदी विजय दळवी, पाणीपुरवठा व जल:निस्सारण समिती सभापतिपदी मोहन जिरंगे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी आशाताई कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी या सर्व समित्यांच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली.
नगरपंचायत सभागृहात तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. आमदार मानसिंगराव नाईक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली.
शिक्षण नियोजन व बांधकाम समिती सभापतिपदी प्रतिभा पवार यांची तर सदस्यपदी अर्चना शेटे, संजय हिरवडेकर, अभिजित नाईक, उत्तम डांगे यांची निवड झाली. स्वच्छता वैद्यक, सार्वजनिक आरोग्य व दिवाबत्ती समिती सभापतिपदी विजय दळवी यांची तर सदस्यपदी गौतम पोटे, अर्चना शेटे, अभिजित नाईक, सीमा कदम यांची निवड झाली. पाणीपुरवठा व जल:निस्सारण समिती सभापतिपदी मोहन जिरंगे यांची, तर सदस्यपदी किर्तीकुमार पाटील, सुनंदा सोनटक्के, राजश्री यादव, वैभव गायकवाड यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी आशाताई कांबळे यांची, तर सदस्यपदी सुनंदा सोनटक्के, सुजाता इंगवले, नेहा सूर्यवंशी यांची निवड झाली. स्थायी समिती सभापतिपदी सुनीता निकम यांची तर सदस्यपदी विजय दळवी, प्रतिभा पवार, मोहन जिरंगे, आशाताई कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी याेगेश पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील, नयना कुंभार, अर्चना गायकवाड अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.