सांगली : जिल्ह्यात आता सहकारी संस्थांच्या निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण केली आहे. ‘ड’ गटातील पहिल्या टप्प्यातील ११४ सहकारी संस्थांच्या निवडणुका २३ नाव्हेंबरपर्यंत, तर उर्वरित १३९ संस्थांच्या निवडणुका ३0 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत. क व ड गटातील ९४२ संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया डिसेंबरअखेर होण्याची शक्यता आहे. सहकार कायद्यातील ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणूक प्राधिकरण स्थापन झाले आहे. प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून याबाबत कोणत्याही हालचाली करता आल्या नाहीत. आता निवडणुकीची प्रत्यक्ष तयारी सुरू झाली आहे. ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीला प्राधिकरणाने हिरवा कंदील दर्शविला आहे. आता ‘क’ गटातील संस्थांच्या निवडणुकीची तयारीही करण्यात येत आहे. ‘क’ गटात एकूण ६८९ संस्था निवडणूकपात्र आहेत. ११ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. डिसेंबरअखेर दोन्ही गटातील निवडणुका पार पाडण्याची तयारी झाली आहे. नव्या वर्षात पुन्हा अ, ब या दोन गटातील मोठ्या निवडणुकांची तयारी सुरू होणार आहे. सहकारी संस्थांच्या व्याप्तीनुसार त्यांचे निवडणुकीचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. गटनिहाय प्रत्येक संस्थांची विभागणी केली आहे. सहकार खाते, उपनिबंधक, तसेच संस्थात्मक पातळीवरही निवडणुकीचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्याची पद्धत निश्चित झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यास अडचण नाही. अडचण फक्त एकाचवेळी इतक्या संस्थांच्या निवडणुका घेताना अपुऱ्या पडणाऱ्या यंत्रणेची आहे. सांगली जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र अशीच स्थिती आहे. तरीही सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)निवडणुकीस पात्र संस्थांची गटनिहाय यादी
यावर्षी होणार ९00 संस्थांच्या निवडणुका
By admin | Published: November 02, 2014 10:10 PM