शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

सांगली जिल्ह्यातील ८३ हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित होणार, महावितरणकडून कारवाई सुरू

By अशोक डोंबाळे | Published: February 04, 2023 6:55 PM

ऐन उन्हात पिके कोमेजली

अशोक डोंबाळेसांगली : पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीत जिल्ह्यातील ८२ हजार ७५२ कृषी पंप ग्राहकांकडे २१३ कोटी ३९ लाख तीन हजार रुपये थकबाकी आहे. या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरणने जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली असून, थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात आहे.जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार कृषी ग्राहकांकडे १०१६ कोटी रुपये थकबाकी आहे. तसेच चालू वीज बिलांचे ५५५ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी पाच ते दहा वर्षे थकबाकी कृषी ग्राहकांची संख्या ६२ हजार २०४ असून, त्यांच्याकडे १५६ कोटी ५५ लाख ८१ हजार रुपये आहेत. तसेच १७ हजार ४०२ कृषी ग्राहक १० ते १५ वर्षांपासून थकबाकीदार आहेत.या ग्राहकांकडे ४७ कोटी ४८ लाख सात हजार रुपयांची थकबाकी आहे. तसेच १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत थकबाकीदार कृषी ग्राहकांची तीन हजार १४६ ग्राहक असून, त्यांच्याकडे नऊ कोटी ३५ लाख १५ हजार रुपयांची थकबाकी आहे. या कृषी ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने विशेष मोहीम हाती घेतली आहे.अकडे टाकणाऱ्यांचे जागेवर नियमित कनेक्शनग्रामीण भागातील शेतकरी वीज कनेक्शनसाठी अर्ज करून थकल्यानंतरही महावितरणकडून विद्युत कनेक्शन मिळाले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जवळच्या विद्युत तारेवर अकडे टाकून कृषी पंप चालू केले होते. या कृषी ग्राहकांना महावितरणने दिलासा दिला असून, जागेवरच त्यांना विद्युत कनेक्शन देण्याची भूमिका महावितरणने घेतली आहे.पाच वर्षांवरील थकीत कृषी ग्राहकविभाग - ग्राहक संख्या - थकीत रक्कमइस्लामपूर - १०२०४ - १८.२७ कोटीक.महांकाळ - २८३६३ - ८४.४८ कोटीसांगली ग्रामीण - १७७३६ - ३९.२४ कोटीसांगली शहरी - ४५३ - १.१२ कोटीविटा   - २५९९६ - ७०.२५ कोटीएकूण - ८२७५२ - २१३.३९ कोटी

ऐन उन्हात पिके कोमेजलीऐन उन्हाळ्यात महावितरण कंपनीने थकबाकीदार कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. याचा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी मधुकर जाधव यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीmahavitaranमहावितरणelectricityवीज