सांगली : जिल्ह्यात अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांची प्रवेश क्षमता ४५,८८०, तर संयुक्त, इतर पदविका, तसेच आयटीआयकडील प्रवेश क्षमता ४८१४ विद्यार्थ्यांची आहे. पण दहावीचे ३४,४०९ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांना केवळ अकरावीसाठी ११,४७१ विद्यार्थ्यांची कमतरता भासणार आहे. कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेतील जवळपास दीडशे तुकड्या कमी होणार असल्यामुळे तेवढ्याच शिक्षकांच्या नोकऱ्यांवरही गंडांतर येणार आहे.
जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, तसेच स्वयंअर्थसाहाय्यीतमधील २६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सर्व शाखांच्या ५४० तुकड्या असून, तेथे ४५ हजार ८८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. इतर पदविका व आय टी आयकडील प्रवेश क्षमता ४८१४ विद्यार्थी आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी दहावीचा निकाल सात टक्के कमी लागला. जिल्ह्यात दहावी परीक्षेत ३४ हजार १४६ नियमित व २६३ पुनर्परीक्षार्थी असे एकूण ३४ हजार ४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेश क्षमतेच्या १६ हजार २८५ विद्यार्थी कमीच आहेत. तरीही नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशचे विद्यार्थी व पालकांना वेध लागले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमता जादा असली तरी, ठराविक कनिष्ठ महाविद्यालये व ठराविक अभ्यासक्रमांनाच जास्त मागणी असते. दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना येत्या दोन दिवसात गुणपत्रिका मिळणार आहेत. त्यानंतर अकरावीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.शिक्षकही : अडचणीतसांगली, मिरज आणि इस्लामपूर, विटा शहरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची जास्त गर्दी आहे. त्यामुळे येथेच प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. काही नामांकित कनिष्ठ महाविद्यालये सोडल्यास अकरावीच्या दीडशे तुकड्या बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीडशे शिक्षकांच्या नोकऱ्यांवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील महाविद्यालयांत विभागनिहाय अकरावी प्रवेश क्षमता...कला शाखा वाणिज्य विज्ञान इतरतुकड्या प्रवेश क्षमता तुकड्या प्रवेश क्षमता तुकड्या प्रवेश क्षमता तुकड्या प्रवेश क्षमता एकूणअनुदानित १७१ १३६८० २७ २१६० ७४ ७८८० ३१ २४८० २५२००विनाअनुदानित ३९ ३१२० २१ १६८० ६८ ६०४० ०६ ४८० ११३२०कायम विनाअनुदान ०१ ८० ०२ १६० २२ २१६० —- —- २४००स्वयंअर्थसाहाय्यीत ३४ २७२० ०६ ४८० ३८ ३७६० —- —- ६९६०एकूण २४५ १९६०० ५६ ४४८० २०२ १८८४० ३७ २९६० ४५८८०