सांगली : २००५ पर्यंत दहावीच्या मध्यम गुणवत्ताधारकांसाठी डीएडचा अभ्यासक्रम सर्वाधिक लोकप्रिय होता. यशाची शंभर टक्के खात्री आणि सरकारी नोकरीची २०० टक्के हमी यामुळे गल्लोगल्ली डीएड महाविद्यालये सुरु झाली, त्यातून गुरुजींचा अक्षरश: महापूर आला. नोकरभरतीवर मऱ्यादा आली, गुरुजींच्या नोकऱ्या कमी झाल्या तशी ही कृत्रिम सूज भराभर उतरत गेली. त्याचा परिणाम महाविद्यालये बंद होण्यावर झाला. आजमितीस जिल्ह्यातील २८ पैकी ११ महाविद्यालयात प्रवेश बंद आहेत. यापैकी दोन महाविद्यालयांनी मान्यता रद्द करुन घेतली आहे, तर उर्वरीतांनी मान्यता कायम ठेवत प्रवेश बंद केले आहेत. प्रवेशाअभावी ५९० जागा रिक्त आहेत. ही सर्व महाविद्यालये विनाअनुदानित आहेत.
महाविद्यालये बंद झाल्याने तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही संपुष्टात आल्या. काही संस्थांनी या कर्मचाऱ्यांची आपल्या अन्य महाविद्यालयांत सोय केली, पण उर्वरीतांना अन्य रोजगाराशिवाय पऱ्याय राहिला नाही. २०१० च्या महाभरतीमध्ये बारा हजार जागा भरल्या गेल्या, त्यानंतर दहा वर्षे भरती झालीच नाही, त्यामुळेही डीएडकडील प्रवाह ओसरला. जिल्ह्यात आजमितीस सुमारे बारा हजार गुरुजी बेरोजगार आहेत. डीएड प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन सुरु आहे, मात्र पुरेसा प्रतिसाद नाही. नोकऱ्या धोक्यात असल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांचा संघर्ष सुरु आहे.गेल्या वर्षीपेक्षा प्रवेशाची स्थिती चांगली आहे. प्रवेशासाठी शासनाने विशेष फेरी सुरु केली आहे. ऑनलाईन प्रक्रिया जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. विद्यार्थी मिळत नसल्याने पंधरा विद्यार्थ्यांवरही वर्ग सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
- रमेश होसकोटी,
प्राचार्य, डाएट, सांगली१५ विद्यार्थ्यांवरही वर्ग सुुरु
अकरापैकी सात महाविद्यालये अनुदानित आहेत. त्यांची प्रवेश क्षमता ४० आहे. पण विद्यार्थी मिळत नसल्याने शासनानेच क्षमता कमी केली आहे. १५ विद्यार्थी मिळाले तरी महाविद्यालय सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांअभावी प्रवेश बंद केेलेत, पण मान्यता कायम ठेवली आहे.२०११ मध्ये डीएड केले, पण भरतीच नसल्याने बेरोजगारीचा सामना करत आहे. एका खासगी शाळेत तात्पुरते काम करत आहे. सध्याच्या शिक्षकभरतीत संधी मिळण्याची अपेक्षा आहे, अन्यथा वयोमऱ्यादा संपण्याची टांगती तलवार आहे.
- नितीन कोळेकर,
बेरोजगार तरुण
-------------