शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

आमदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी -शामरावनगरप्रश्नी नाराजी : लागेल तेवढा मुरुम टाकण्याचे आदेश,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 11:55 PM

सांगली : दलदलीत रुतलेल्या सांगलीच्या शामरावनगर परिसरास सोमवारी आ. सुधीर गाडगीळ यांनी भेट देऊन रस्तेकामाची पाहणी केली. गैरसोयी पाहून आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली. लागेल तेवढा मुरुम या भागात टाकून सपाटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.सर्वत्र दलदल आणि सांडपाण्याचे अस्तित्व असलेल्या शामरावनगरमधील नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून ...

ठळक मुद्देगुडघाभर चिखलातून पायपीट

सांगली : दलदलीत रुतलेल्या सांगलीच्या शामरावनगर परिसरास सोमवारी आ. सुधीर गाडगीळ यांनी भेट देऊन रस्तेकामाची पाहणी केली. गैरसोयी पाहून आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली. लागेल तेवढा मुरुम या भागात टाकून सपाटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सर्वत्र दलदल आणि सांडपाण्याचे अस्तित्व असलेल्या शामरावनगरमधील नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. पालकमंत्र्यांसमोरही याविषयी गाºहाणे मांडले होते. याची दखल घेत आमदार गाडगीळ, अभियंता ए. ए. क्षीरसागर, माजी उपमहापौर शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह भाजपचे काही कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी सोमवारी शामरावनगरला भेट दिली. अरिहंत कॉलनी, महसूल कॉलनी, सुंदर कॉलनी, विठ्ठलनगर, अष्टविनायक कॉलनी, समता कॉलनीचे सर्वच रस्ते, अंतर्गत बोळ याठिकाणची त्यांनी पाहणी केली. गुडघाभर चिखल, रस्त्यापासून फूटभर उंचीवर असलेले ड्रेनेज, सांडपाण्याचे तलाव असे चित्र त्यांना पाहावयास मिळाले.

वर्षानुवर्षे येथे राहून अशाप्रकारची दुरवस्था तुम्ही लोक कशी सहन करता? याठिकाणच्या नगरसेवकांना चार-चारवेळा कसे निवडून देता, असे सवाल गाडगीळ यांनी नागरिकांसमोर उपस्थित केले. गाडगीळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साळुंखे यांना फोन लावला. ‘तुम्ही एसीमध्ये बसून अधिकारशाही गाजवा, लोक येथे मला जाब विचारत आहेत’ असे सुनावले. साळुंखे शामरावनगरात धावत आले. त्यांनी मुरुमीकरणाची कामे सुरू असल्याचा खुलासा करताच गाडगीळ भडकले. काम कुठे सुरू आहे दाखवा, अशा पद्धतीने कधी मुरुम पडणार, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. माणसे वाढवा, ठेकेदार वाढवा. लागेल तेवढा मुरुम मी भाजपच्यावतीने देतो. पण गल्ली-बोळात मुरुमीकरण करा. पावसाळ्यात लोकांना घराबाहेर पडताना त्रास होता कामा नये, असेही त्यांनी आदेश दिले.

अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या असून, सांडपाणी निचºयाची व्यवस्था नसल्याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या. यावर गाडगीळ यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर, पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये यांना फैलावर घेतले. रस्ते मुरुमीकरणापूर्वी तात्काळ गळती काढा, नागरिकांना गळतीमुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे याबद्दल लक्ष द्या, असेही बजावले. यासाठी चार-सहा माणसे कायमस्वरूपी तैनात करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शरद नलावडे, संदीप दळवी, अमर पडळकर, रज्जाक नाईक, युवा नेते सुयोग सुतार, सुब्राव मद्रासी, सुधाकर पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.त्यांना निवडून का देता?शामरावनगरमधील नागरिकांना किती वर्षांपासून राहता, असा सवाल गाडगीळांनी केल्यावर काहींनी १५ ते २० वर्षे, तर काहींनी ४० वर्षे रहात असल्याचे आणि हालअपेष्टा सहन करीत असल्याचे सांगितले. यावर गाडगीळ म्हणाले, एवढी वर्षे राहून तुम्ही हा अन्याय सहन का करीत आहात. वारंवार त्याच नगरसेवकांना तुम्ही निवडून का देता, असे सवाल केले. नागरिकांनीही प्रत्युत्तर देत यावेळी त्यांचा हिशेब करू, असे स्पष्ट केले. 

शामरावनगरमध्ये पुन्हा दलदल!वर्षानुवर्षे दलदलीत रुतलेल्या शामरावनगरात पुन्हा दोन दिवस झालेल्या पावसाने दयनीय अवस्था झाली आहे. ड्रेनेजमुळे गल्ली-बोळच काय, मुख्य रस्तेसुद्धा गुडघाभर चिखलात रुतले आहेत. नागरिकांना शंभर फुटीपासूनच राडेराड होऊन घराकडे ये-जा करावी लागते. वाहने रस्त्याकडेलाच लावावी लागतात. याबाबत अनेकवेळा सर्वपक्षीय कृती समिती, नागरिकांनी आंदोलने करूनही महापालिकेमार्फत उपाययोजना झाल्या नाहीत.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस