शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शिराळ्यात जोर कायम

By admin | Published: July 12, 2016 11:43 PM

मोरणा नदीलाही पूर : वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली

शिराळा : शिराळा तालुक्यात सतत अतिवृष्टी सुरू असून, वारणा व मोरणा नदीस पूर आला आहे. वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे.चांदोली धरण व अभयारण्य परिसरात पावसाची संततधार कायम असून चांदोली धरण ५३.२० टक्के भरले आहे. धरणात १८.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दररोज सरासरी २ टीएमसीने धरणाचे पाणी वाढत आहे. धरण पातळी ६०८ मीटर झाली आहे.तालुक्यात सर्व मंडल क्षेत्रात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू आहे. शिराळ्यात ९३ मि.मी. (६१० मि.मी.), वारणावती - १३२ (१०६९), सागाव - १३८ (६६०), मांगले - १२९ (७२५), चरण - ११९ (७६२), कोकरूड - ९७ (७६६), शिरशी - ५३ (३५४) असा मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील मोरणा, करमजाई, अंत्री, टाकवे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. शिवणी धरण ९४ टक्के भरले आहे. तालुक्यातील पाझर तलाव भरले आहेत.वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे चरण येथील ऊसशेती खचून मोठे नुकसान झाले आहे. वाकुर्डे, कोकरूड येथे घरांच्या भिंती पडल्या आहेत. वारणा नदीवरील आरळा-शित्तूर, मांगले-काखे, मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे हे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोडोली, पन्हाळा, कोल्हापूर या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.काळुंद्रे येथील हुबाल वस्तीत पाणी शिरले असून, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. आरळा- येसलेवाडी येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तालुक्यातील २६ पुलांखालील गावांना तहसीलदार यांनी सतर्कतेचा इशारा दिला असून तहसील कार्यालयात पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तलाठी, ग्रामसेवक यांना गाव न सोडल्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिळाशी येथे झाडे उन्मळून पडली आहेत. नैसर्गिक आपत्तीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.खरीप हंगामातील भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकात पाणी साठल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाणी साठल्यामुळे खड्डे पडले असून, वाहन चालविणे कठीण झाले आहे. मोरणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सलग ७२ तास झालेल्या अतिवृष्टीमुळे ४२२ मिलिमीटर पावसासह एकूण १०६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ५१८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १८.३० टीएमसी झाला आहे, तर धरण पातळी ६०८.00 मीटर झाली आहे. त्याची टक्केवारी ५३.२० अशी आहे. (वार्ताहर)जनावरांचे स्थलांतरकोकरूड : १ जुलैपासून सुरू असणारा संततधार पाऊस मंगळवारीही कायम होता. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे कोकरूड गावच्या शिवारात पाणी शिरल्यामुळे नदीकाठी वस्ती करून असलेल्या जनावरांना गावात हलविण्यात आले आहे. शिराळ्याच्या पश्चिम भागातील कोकरूड, बिळाशी, मांगरूळ, चरण, आरळा येथील शेतकऱ्यांनी आपली जनावरे गावात आणली आहेत. या परिसरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. कोकरूड, बिळाशी, मांगरूळ येथील स्मशानशेडला पाणी लागले आहे. मंगळवारी कोकरूड परिसरात ९७ मि. मी. पाऊस पडला. या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.