शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

कर्मचारी भरती अडचणीत

By admin | Published: December 04, 2014 12:46 AM

जिल्हा बँक गैरव्यवहार : पुढील आठवड्यात कलम ८८ ची चौकशी

सांगली : कायदेशीर आधारच नसल्याने जिल्हा बँकेतील ६0 शिपाई आणि ३५ लिपिकांची भरती अडचणीत सापडली आहे. चाचणी लेखापरीक्षण आणि कलम ८३ च्या चौकशीत दोन्ही वेळेला या भरतीच्या कायदेशीर आधाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे तत्कालीन संचालक, अधिकारी यांच्यासह लिपिक, कर्मचाऱ्यांचीही चिंता वाढली आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात कलम ८८ च्या चौकशीचे आदेश विभागीय सहकार उपनिबंधकांकडून काढण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने १२ जून २00१ रोजी ठराव क्रमांक ४ (७) नुसार २५ लोकांना शिकाऊ शिपाई म्हणून नियमबाह्यरित्या नियुक्त केले. त्यांना नंतर कायमही करण्यात आले. त्याचवेळी संचालक मंडळाने तात्पुरती व्यवस्था म्हणून ७८ लोकांना रोजंदारीवरील शिकाऊ लिपिक व १९ लोकांना रोजंदारीवरील शिपाई या पदांवर घेतले होते. भरतीसाठी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. लेखी अथवा तोंडी परीक्षा पद्धतीला फाटा देण्यात आला. नोकर भरतीसाठी असलेले सर्व नियम व संकेतांचे पालन झाले नसल्याने ही भरती आता अडचणीत आली आहे. याशिवाय शासनाच्या मंजुरीपेक्षा जादा भरतीही करण्यात आल्याने कलम ८८ च्या चौकशीत याबाबत पुन्हा गंभीर ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे. भरतीला कायदेशीर आधारच नसल्याने संबंधित संचालक, अधिकारी आणि भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसमोर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरती प्रक्रियेवर कायदेशीर शिक्कामोर्तब होण्याची कोणतीही शक्यता आता दिसत नाही. सेवायोजना, समाजकल्याण व आदिवासी विभागाकडून याद्या मागविणे, मागासवर्गीयांना भरतीत प्राधान्य देणे, अंध, अपंग अनुशेष भरणे, शैक्षणिक अटींचे पालन करणे, मागासवर्गीयांची रोस्टरनुसार आकडेवारी ठेवणे, असे अनेक नियम डावलण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)