इस्लामपूर : राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स आणि माहिती व तंत्रज्ञान विभागात शिवाजी विद्यापीठाच्या लीड कॉलेज योजनेंतर्गत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयटी उद्योगातील रोजगार कौशल्य विकास’ या विषयावर कार्यशाळा झाली.
पुण्याचे सोहम दादरकर म्हणाले, ‘कोणत्याही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कौशल्य व ज्ञान या दोन प्रेरणादायी बाबी आहेत. सध्याच्या वैश्विक परिस्थितीमध्ये ज्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे उच्च कौशल्य पातळी आहे, ते देश कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतात. कोणत्याही देशामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमासाठी मुख्यत: युवा पिढीवर लक्ष केंद्रित केले जाते.
या कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून प्रा. एम. एन. मुल्ला यांनी काम पाहिले. या कार्यशाळेच्या संयोजनासाठी सीएस अॅण्ड आयटी विभागप्रमुख डॉ. अमोल आडमुठे, संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, सचिव आर. डी. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.