शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

काँग्रेसची कीड संपवा!

By admin | Published: January 06, 2017 12:17 AM

सुभाष देशमुख : सांगलीत रस्ते, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सांगली : सांगली जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांची काँग्रेसने वाट लावली आहे. सहकाराची वाट लावणारी काँग्रेसची कीड संपवा, असे आवाहन नूतन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी केले. सांगलीतील विश्रामबाग ते कृपामयी या रस्त्याचे सहापदरीकरण, तसेच कुपवाड ते सूतगिरणी रस्ता कामाचा प्रारंभ व संजयनगर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात देशमुख बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सुजित काटे, सुभाष गडदे यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचा सत्कार करण्यात आला. देशमुख म्हणाले की, संजयनगर परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी झाले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची काँग्रेसने वाट लावली. अनेक सहकारी संस्था संपविल्या. काँग्रेस संपली की सांगलीची कीड संपेल. सांगलीकरांनी काँग्रेसमुक्त शहराचा संकल्प करावा. देशातील व राज्यातील भाजप सरकारने शेवटच्या माणसाचा उद्धार करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे वर्ष गरीब कल्याण वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यात २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेत सर्वांनी नोंदणी करावी. मुद्रा योजनेतून तरूणांना कोट्यवधीचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. अन्न, वस्त्र व निवारा या जनतेच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येत्या दोन वर्षात आपण नावीन्यपूर्ण योजना राबविणार असल्याची ग्वाहीही देशमुख यांनी दिली. आ. गाडगीळ म्हणाले की, गेल्या दोन वर्षात संजयनगर परिसरात कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. ही तर सुरुवात आहे. पुढील तीन वर्षात संजयनगर भागातील एकही काम शिल्लक राहणार नाही. प्रारंभी श्रीकांत वाघमोडे यांनी स्वागत, तर दीपक माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नीता केळकर, शेखर इनामदार, दिनकरतात्या पाटील, दरिबा बंडगर, सुजित काटे यांची भाषणे झाली. सुभाष बुवा, किरण सर्जे, सुवर्णा कदम, गंगा तिडके यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी दीपक मासाळ, रमेश शिंदे, नूतन मोटे, गजानन सरगर उपस्थित होते. (प्रतिनिधी)