सांगली : जवाहर नवोदय विद्यालय, पलूस येथे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी इयत्ता ६वी करिता ८० जागा भरण्यात येणार आहेत. याची प्रवेश परीक्षा बुधवार, दि. ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील ३० विविध परीक्षा केंद्रांवर होणार असून, सकाळी दहा वाजता आपल्या हॉल तिकीटसह वरील परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
------
आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षण
सांगली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सध्या राबविण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्यांना मोफत प्रशिक्षण शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.