शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2016 11:39 PM

अन्यायी दरवाढ : अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी

कुपवाड : महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. या दरवाढीने उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालून ही अन्यायी दरवाढ त्वरित रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी कृष्णा व्हॅली चेंबर, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, उद्योग विकास आघाडीसह इतर उद्योजक संघटनांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता व जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. या अन्यायी दरवाढीविरोधात उद्योजकांनी एल्गार पुकारला आहे. महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे पाठविलेल्या प्रस्तावामध्ये राज्यातील वीज ग्राहकांवर ५६,३७२ कोटींची दरवाढ लादली आहे. ही दरवाढ पहिल्यावर्षी १९ टक्के आणि चौथ्यावर्षी २७ टक्के होणार आहे. ती औद्योगिक, घरगुती, व्यापारी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडणारी असून औद्योगिक क्षेत्र भकास करणारी आहे. वास्तविक इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे वीजदर ४० टक्क्यापर्यंत जास्त आहेत. हे दर स्पर्धात्मक पातळीवर आणण्याची गरज आहे, अशी मागणी उद्योजकांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. डी. चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, चेंबरचे कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, दीपक शिंदे-म्हैसाळकर, वाळवा चेंबरचे अध्यक्ष सर्जेराव यादव, विटा यंत्रमाग संघटनेचे किरण तारळेकर, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघटनांनी प्रथम अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी महावितरणच्या दरवाढीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंत्यांनी उद्योग संघटनांना उद्योजकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळविण्याचे आश्वासन दिले. उद्योजकांच्यावतीने सतीश मालू, संजय अराणके, दीपक शिंदे, शिवाजी पाटील, किरण तारळेकर, डी. के. चौगुले या उद्योजकांनी निवेदन देतेवेळी दरवाढीबाबत म्हणणे मांडले.आंदोलनावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष पांडुरंग रूपनर, रमेश आरवाडे, सचिव चंद्रकांत पाटील, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद पाटील, उद्योजक के. एस. भंडारे, अरविंद जोशी, बन्सी ओस्तवाल, हरीभाऊ गुरव, शशिकांत मसुटगे, नंदकुमार महाजन, प्रकाश पाटील, सुधीर भगत, अजय खांबे, बामणोली इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत चिमड, दीपक मर्दा, गुंडू एरंडोले, रतिलाल पटेल, संजय बेडगे, विजय भगत, सदाशिव मलगान, संतोष भावे, गणेश निकम, बी. एस. सूर्यवंशी उपस्थित होते. (वार्ताहर)तीस हजार हरकती : उद्योजक आक्रमक होणारकृष्णा व्हॅली चेंबर, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, उद्योग विकास आघाडी, वसंतदादा औद्योगिक वसाहतीसह इतर संघटनांनी पुढील कालावधित आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शासनाला उद्योजकांच्या तीस हजार हरकती पाठविल्या जाणार आहेत. खासदार, आमदारांना दरवाढ कमी करण्यासाठी निवेदने दिली जाणार आहेत. त्यानंतरही शासनाने दर कमी न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असा इशारा उद्योजकांनी दिला. शासनाने वेळीच या अन्यायाची दखल घेऊन दरवाढ कमी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.उद्योग विकास आघाडीचे नेते डी. के. चौगुले, मनोज भोसले, अशोक कोठावळे, जफर खान, रवींद्र मिरजकर, अंकुश चव्हाण आदींच्या नेतृत्वाखाली उद्योजकांनीही जिल्हाधिकारी व महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. ‘उद्योग क्षेत्राला ग्रहण लागले, सरकारला देणे-घेणे नाही उरले’, ‘वीज दरवाढीने यंत्रमाग उद्योग होतोय भकास, ठप्प होतोय महाराष्ट्राचा विकास’, अशा घोषणांचे फलक झळकविण्यात आले.