शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

डाळिंब बागांसाठी उद्योजक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 12:24 AM

शेततळ्यातून मोफत पाणी : वाळेखिंडीत हिंगमिरे, जमादार यांचा उपक्रम

भागवत काटकर- शेगाव--दुष्काळाच्या तीव्रतेत दिसेंदिवस वाढ होत आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी जिवापाड जपल्या आहेत. वाळेखिंडी (ता. जत) येथे पाण्याची पातळी ८०० ते १००० फुटांपर्यंत गेली आहे. डाळिंब बागा जगविण्यासाठी बोेअरवेल खोदूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांपुढे डाळिंब बागा जगविण्याचे आव्हान होते. गावाच्या दक्षिणेला उद्योजक महादेव हिंगमिरे व इकबाल जमादार यांनी मोठे शेततळे खोदले आहे. या तलावातील पाणी त्यांनी डाळिंब बागा जगविण्यासाठी व जनावरांना पाण्यासाठी सर्वांना खुले करून मोफत पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे वाळेखिंडीतील डाळिंब बागांना जीवदान मिळणार आहे. उद्योजक हिंगमिरे व जमादार यंच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई तर आहेच, शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणारे डाळिंब क्षेत्रही वाढत आहे. मात्र पाण्याची पातळी खालावल्याने डाळिंब बागा वाचावयाच्या कशा? या काळजीत येथील शेतकरी होते. हिंगमिरे व जमादार यांनी शेतकऱ्यांना शेतातील शेततलाव खुले केले आहे. सर्वत्र शेतकऱ्यांना या तलावातून पाणी बागांना देण्यासाठी उपलब्ध केले आहे. या तलावातून पाण्याचे काही छोटे टॅँकरही लोकांना पिण्यासाठी उपलब्ध होत आहेत. रोज सुमारे १ लाख लिटर पाणी बागा व पिण्यासाठी उपलब्ध होत आहे. परिसरातील जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत आहे. बागा वाचविण्यासाठी १० कि. मी. अंतरावर असणाऱ्या कोसारी येथील तलावातून शेतकऱ्यांना पाणी आणावे लागत होते. आता हे अंतर तर वाचलेच आहे. शिवाय खर्चात बचतही झाली आहे.पाणी काटकसरीने वापरामहाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कार्यरत नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. शेततलावात पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी डाळिंब बागा वाचविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी उपलब्ध व्हावे, ही तळमळ आहे. बोअरवेलला जादा ताण न देता शिल्लक राहिलेले थोडे थोडे पाणी एका शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यांना दिले, तरच डाळिंब बागा व पशुधन वाचेल. शेतकऱ्यांनीही एकमेकांना सहकार्य केले, तरच शेती व शेतकरी उद्ध्वस्त न होता टिकेल. सहा महिने पावसाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे जरुरीचे आहे, असे मत उद्योजक, महादेव हिंगमिरे, इकबाल जमादार यांनी व्यक्त केले.