म्हैसाळ : मिरज तालुक्यातील एरंडोली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या जान्हवी ग्रामविकास पॅनेलच्या नूतन नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. एरंडोली ग्रामपंचायतीसाठी पॅनेलप्रमुख बी. के. पाटील, महेश मोरे, उत्तम माने यांनी जान्हवी ग्रामविकास पॅनेल उभा करून निवडणूक लढविली होती. नऊ उमेदवार निवडून आले होते. गावाच्या विकासासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे नूतन सदस्यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्यांचा मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते सत्कार केला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्याबद्दल सर्व सदस्यांनी मनोज शिंदे-म्हैसाळकर यांचा सत्कार केला.
चौकट
यांनी केला प्रवेश
पॅनेलप्रमुख बी. के. पाटील, महेश मोरे, उत्तम माने, आत्माराम जाधव, सचिन पोतदार, बबन मोरे, प्रसाद चौगुले, सचिन नलवडे, गोरखनाथ निकम, भारत माने यांचा समावेश आहे.
कोट
जान्हवी ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना विविध विकासकामे करण्याची आश्वासने आम्ही ग्रामस्थांना दिली होती. ती आश्वासने पूर्ण करण्यासाठी व राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहे. आम्ही मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वात गावाचा विकास करणार आहे.
-बी. के. पाटील, पॅनेलप्रमुख, जान्हवी ग्रामविकास एरंडोली.