शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

राज्यस्तरीय महामार्ग, प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समितीची स्थापना, पुण्यातील बैठकीत निर्णय

By संतोष भिसे | Published: November 20, 2023 3:38 PM

सांगली : राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या महामार्गांच्या कामांत हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष ...

सांगली : राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या महामार्गांच्या कामांत हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष आणि पाठपुरावा सुरु आहे. या सर्व बाधित शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटनांची एकच संयुक्त राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि. १९) झालेल्या व्यापक बैठकीत संयुक्त समितीची घोषणा करण्यात आली. यावेळी शरद पवार, प्रल्हाद गायकवाड, डॉ. ओमन पाटील, विश्वास साखरे, नितीन साळुंखे, विनय कुंभार, प्रसाद घोनंद, प्रकाश केमसे, योगेश मांगले, राजाभाऊ गाढे, दिगंबर कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. आंदोलनाला नेमकी दिशा मिळावी आणि राज्यस्तरावर शेतकऱ्यांसाठी एकसारखे शासकीय निर्णय व्हावेत यासाठी संयुक्त समितीचा निर्णय घेण्यात आला.या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी घेतल्या आहेत. त्यांचे वेगवेगळे मूल्यांकन केले जात आहे. मूल्यांकनासाठी वेगवेगळे निकष लावले जात  आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या कामात जमिनींना मिळालेला भाव अन्य महामार्गांसाठी दिला जात नाही. याविरोधात शेतकरी संघर्ष समित्या ठिकठिकाणी लढा देत आहेत. हा लढा एकमुखी होण्यासाठी सर्व समित्या एकाच झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत. त्यातूनच महामार्ग व प्रकल्प बाधीत शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील बैठकीत महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विस्तृत चर्चा झाली. बाधीत क्षेत्राचे योग्य मूल्यांकन, वास्तववादी किंमत, प्रतिएकरी किमान दोन कोटी रुपये मोबदला, भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढण्याचे ठरले.यावेळी संतोष लोखंडे, गुलाबराव चौधरी, गोविंद घाटोड, मारोती मुंढे, धोंडीराम लांबाडे, सुरेश मानमोडे, विलास गावंडे, प्रशांत मानधने, संतोष दहातरे, जगदीश दहातरे, रमेश गावंडे, शिवाजी इंगळे, अनिल शिंदे, दिगंबर मोरबाळे, गणपती येसणे यांच्या राज्य समन्वयक समिती सदस्यपदी निवडी झाल्या. 

सध्या सुरु असणारे प्रकल्पराज्यात सध्या पुणे बंगळुरु हरित महामार्ग, सूरत - चेन्नई हरित महामार्ग, नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग, संकेश्वर - बांदा महामार्ग, पुणे वळण मार्ग, अकोला - नांदेड महामार्ग, पुणे- नाशिक लोहमार्ग, पुणे -नाशिक महामार्ग, मुंबई- नागपूर समृध्दी महामार्ग, पुणे - मिरज लोहमार्ग, गुहागर - विजापूर महामार्ग आदी कामे सुरु आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत, तर काही कामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.

राज्य संघटनेच्या निवडीराज्यव्यापी संघर्ष समितीचे निमंत्रक म्हणून दिगंबर कांबळे, प्रा. दिनकर दळवी, राजन क्षीरसागर, बाळासाहेब मोरे, राजाभाऊ चोरगे, नारायण विभुते,  शिवाजी गुरव यांच्या निवडी झाल्या.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी