शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
2
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
3
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
4
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
5
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
6
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
8
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
9
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
10
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
11
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
12
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
13
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
14
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
15
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
16
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
17
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
18
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
19
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
20
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!

सांगलीत ‘महाआघाडी’च्या नेत्यांमध्ये विधानसभेपूर्वीच कुरघोड्या

By अशोक डोंबाळे | Published: July 01, 2024 6:10 PM

जतमध्ये ‘विश्वजीत’ना जयंतरावांचा शह 

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील जत, मिरज व खानापूर - आटपाडी या तीन विधानसभा मतदारसंघांत तयाच्या सूचना काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दवसेना या पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यावरून विधानसभा जागा वाटपापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच तापले आहे.नूतन खासदार विशाल पाटील यांचा आठवड्यापूर्वी सांगलीत मेळावा झाला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व पलूस - कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जनतेने भरभरून मदत केली आहे. कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. काँग्रेस पक्षाकडे जिल्ह्यातील पलूस - कडेगाव, सांगली, जत, मिरज, खानापूर - आटपाडी अशा पाच जागा मागणार आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. या मेळाव्यानंतर उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खानापूर - आटपाडी आणि जत विधानसभा मतदारसंघावर उध्दवसेनेचाच दावा आहे. या जागेवर अन्य कुणीही दावा सांगू नये, अशी मागणी केली होती.चार दिवसांपूर्वी सांगलीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूण लाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ‘वाळवा, शिराळा आणि तासगाव - कवठेमहांकाळ येथे आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. आता जिल्ह्यातील आणखी तीन जागा पक्षाला मिळवाव्या लागतील. यासाठी मिरज, जत व खानापूर - आटपाडीतील कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.’खानापूर-आटपाडीसाठी दोन्ही काँग्रेसचा दावाखानापूर - आटपाडीचे प्रतिनिधीत्व करणारे अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले. ही जागा सध्या रिक्त असली तरी या ठिकाणी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आमदार बाबर यांची निवड झाली होती. त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. तरीही या जागेवर उध्दवसेनेने दावा केला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही दावा केल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपापूर्वीच नेत्यांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगले आहे.जतमध्ये ‘विश्वजीत’ना जयंतरावांचा शह डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार काँग्रेसचे निवडून आणायचे आहेत, असे जाहीर वक्तव्य केले. सध्या पलूस - कडेगाव आणि जत या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आहे. जतमध्ये डॉ. कदम यांचे नातेवाइक आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत हे आमदार आहेत. त्यांनाच काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्यता असताना राष्ट्रवादीनेही येथे तयारी सुरू केल्याने हा एक प्रकारे कदम यांना शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणVishwajeet Kadamविश्वजीत कदमJayant Patilजयंत पाटीलcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना