शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सांगली जिल्ह्यातील चिंचणीसारख्या खेड्यातही १८८९ ला स्त्री शिक्षणाची सुरुवात, मोडी लिपीतून उलगडला इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 6:32 PM

सावित्रीच्या लेकींच्या आढळल्या नोंदी

प्रताप महाडिककडेगाव : चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत कुणबी नोंदी शोधत असताना १८८९ ते १८९३ च्या काळात तीन मुलींची प्रवेश नोंद आढळली आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध सत्ताधीशांच्या काळातील ८०० वर्षांचा लेखाजोखा मोडी लिपीमध्ये शब्दबद्ध झाला आहे. आजच्या डिजिटलच्या जमान्यात हा खजिना बाहेर येणे धूसर असताना कुणबी नोंदीच्या शोध मोहिमेच्या यानिमित्ताने हा इतिहास थोडाफार उलगडला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य जोतिराव फुले या दाम्पत्यांच्या मार्गावरून जाणाऱ्या हजारोंपैकी तीन मुलींची नोंद चिंचणीत आढळली.चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत अशोक नगरे यांनी मोडी लिप्यंतरकार केलेल्या माहितीप्रमाणे या शाळेत संभुदा सीताराम पाटील या ६ मे १८८९ मध्ये सहा वर्षांची असताना शाळेत आल्याची व २८ जुलै १८९७ इयत्ता ५वीपर्यंत शिक्षण घेतल्याची व पुढे सासरी गेली सबब काढली अशी नोंद आहे. यानंतर कमळा चंद्रा माने ही मुलगी २ जून १८९१ रोजी सात वर्षांची असताना शाळेत आल्याची नोंद आहे. २२ ऑक्टोबर १८९६ पर्यंत तिने या शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. फार दिवस रजेवर सबब काढली अशी नोंद आहे.जया विठू गवंडी ही मुलगी ६ जून १८९३ या तारखेस ८ वर्षे असताना शाळेत आल्याची नोंद आहे. २४ फेब्रुवारी १८९७ पर्यंत शाळा शिकली, पुढे घरकाम करणेकरिता घरी ठेवून घेतले अशी नोंद आहे. या तिन्ही मुलीची वर्तणूक फार चांगली अशी नोंद आहे. या तिन्ही मुलींची कुणबी नोंद आहे.

मुलींना फी माफीच्या नोंदी१८८२ साली महात्मा फुले यांनी ''विल्यम हंटर शिक्षण आयोगा''समोर निवेदन देऊन प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली होती. मात्र, तत्कालीन इंग्रज सरकारने मुलांना फी माफी दिली नसल्याचे व मुलींची फी माफ केल्याच्या नोंदी चिंचणी शाळेत दिसत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिलाEducationशिक्षण