शीतल पाटील ।सांगली : महापालिकेच्या स्थापनेपासून सातत्याने ह्यमिरज पॅटर्नह्णच्या कारभाराची चर्चा होत होती. विशेषत: या पॅटर्नमुळे महापालिका क्षेत्रात काँग्रेस पुरती बदनाम झाली होती. भाजपची सत्ता आल्यानंतर हा पॅटर्न इतिहासजमा होईल, असे बोलले जात होते; पण अखेर भाजपचे सत्ताधारीही ह्यमिरज पॅटर्नह्णच्या वळचणीला गेल्याचे महासभेच्या कामकाजावरून स्पष्ट झाले.
विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी बुधवारी महापालिकेची सभा होती. सभेच्या विषयपत्रिकेवर फार महत्त्वाचे विषय नव्हते. मिरजेतील आण्णाबुवा शॉपिंग सेंटरच्या गाळेधारकांना वाढीव जागा देण्याचा विषय चर्चेत होता. त्यामुळे शहरातील इतर प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी नगरसेवकांना होती. विशेषत: महापालिका क्षेत्रात डेंग्यूची मोठी साथ पसरली आहे. प्रत्येक गल्लीबोळात आठ-दहा डेंग्यूचे रुग्ण आहेत. साथीचा फैलाव वेगाने होत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या, त्यात आणखी काय सुधारणा करता येतील, या विषयावर बोलण्यासारखे बरेच काही होते.
लोकांशी निगडीत हा महत्त्वाचा प्रश्न होता. मिरजेतील शिवाजी रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या आठवड्यात खड्ड्यामुळे दोघांचा बळी गेला होता. ड्रेनेज व इतर योजनांची स्थिती काय आहे, अशा विविध विषयांवर नगरसेवकांकडून चर्चा अपेक्षित होती. पण ही अपेक्षा फोल ठरली. अर्धा तासातच प्रचंड गोंधळात सभा गुंडाळण्यात आली. त्यासाठी मागील सभेचे इतिवृत्त अपूर्ण असल्याचे कारण ठरले. वास्तविक दोन महिन्यांचा कालावधी असताना इतिवृत्त का पूर्ण करण्यात आले नाही, हा खरा प्रश्न आहे.
यापूर्वीच्या सत्ताकाळातही महासभेचे इतिवृत्त अपूर्ण ठेवले जायचे. काही विषय नंतर घुसडले जायचे. त्यातून पदाधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जपण्याचे प्रकार घडले होते. मध्यंतरी सभा गुंडाळण्याचा मिरज पॅटर्न महापालिकेत गाजला होता. आर्थिक फायद्याचा विषय असेल तर, किरकोळ विषयावरून सभेत गोंधळ घालण्यास भाग पाडले जायचे. त्या गोंधळातच सर्व विषय मंजूर म्हणत सभागृह सोडायचे, असा नवा पायंडा पडला होता. काही सभा तर सुरू होण्यापूर्वीच संपल्या होत्या. पाच ते दहा मिनिटात सभा संपविण्याचा विक्रमही तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केला होता. विविध पदांवर मिरजेच्या नगरसेवकांचे वर्चस्व असले की असे प्रकार घडत होते.
या मिरज पॅटर्नने काँग्रेसला पुरते बदनाम केले होते. हा डाग अजूनही काँग्रेसच्या माथी आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर येथील कारभाराला शिस्त लागेल, अशी सर्वसामान्य जनतेची आशा होती; पण आता वर्षभराच्या कारभारानंतर भाजपही मिरज पॅटर्नह्णच्या वाटेवरूनच गाडा हाकणार असल्याचे दिसू लागले आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत त्याची प्रचिती आली. एकूण कारभाराचे निरीक्षण केले तर त्यांची दिशा ही ह्यमिरज पॅटनह्णकडे जाताना दिसून येते. त्यामुळे जुन्या आणि नव्या सत्ताधाºयांमधील फरकाची रेषा आता पुसट होत असल्याचे नागरिकांना जाणवत आहे.