शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

युवापिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे; राज्यपाल कोश्यारी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 2:52 PM

दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबातील एक हजार मुलींना 50 हजार रुपयांच्या मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण सोहळा कवठेपिरान रोड, कसबे डिग्रज येथे झाला यावेळी ते बोलत होते.

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ तळगाळातील सर्व तरुण पिढीला मिळवून द्यावा व युवा पिढीला आत्मनिर्भर करुन आत्मनिर्भर भारत करण्यासाठी सर्वांनी महत्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.  दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबातील एक हजार मुलींना 50 हजार रुपयांच्या मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण सोहळा कवठेपिरान रोड, कसबे डिग्रज येथे झाला यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, जलसंपदा मंत्री तथा  सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशिशील माने, आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष दौलत शितोळे, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, ट्रस्टच्या अध्यक्षा दिपाली  सय्यद-भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, रुपाली चाकणकर नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, संजय बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आपत्तीच्या काळात निसर्ग सर्वांचीच पररीक्षा घेत असतो, या काळात सर्वांनी धैर्याने राहुन एकमेकाला मदतीचा हात दिला पाहिजे. भारतात सामाजिक कार्याची परंपरा खुप प्राचिन आहे. सन्मामार्गावर चालणारे लोक, परोपकराची ही परंपरा अखंडपणे चालवत आहेत. याच परंपरेशी नाते सांगणारे दिपाली सय्यद भोसले यांचे कार्य असून त्यांच्या ट्रस्टमार्फत होत असलेले कार्य खुप पुण्याचे आहे.

आपत्तीग्रस्त भागाला मदत करण्याची त्यांच्यातील उर्जा प्रशंसनीय आहे. आपल्याकडे असणाऱ्या साधनसंपत्तीचा उपयोग सर्वांनीच चांगल्या कामासाठी करावा, असे सांगून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिपाली सय्यद- भोसले यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाच्या पातळीवरही व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यांना आशीर्वाद दिले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात कन्या सहाय्य ठेव प्रमाणपत्राचे वितरण केले. 

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, पैशांचा योग्य वापर करुन माणसांवर प्रेम करण्याचे दिपाली सय्यद-भोसले यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांचा हा मार्ग अंधारातून प्रकाशाकडे जाणारा आहे. या कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील ड-1 ची यादी प्रसिध्द करण्यामध्ये लक्ष घालण्याची व आपत्तीग्रस्तांसाठी एन.डी.आर.एफच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येईल असे सांगितले. 

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागातील कुटुंबांना दिलासा देण्याचे दिपाली सय्यद-भोसले चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे. पुरानंतर अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात, जीवन अडचणीत येते. या भागाने आतापर्यंत 3 ते 4 वेळा असे प्रसंग अनुभवले आहेत. दिपाली सय्यद- भोसले यांनी ही परिस्थिती लक्षात घेवून अशा आपत्तीग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभारी असल्याचे सांगितले.

सांगली जिल्ह्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूर स्थितीची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माहिती देऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी महापुराच्या स्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजनांसाठी जलसंपदा विभाग कार्यरत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी किल्ले मच्छिंद्रनाथ पर्यटनासाठी विकसित करण्यात येत असून या ठिकाणाला राज्यपालांनी भेट द्यावी अशी विनंतीही त्यांनी केले. यावेळी खासदार संजय पाटील व खासदार धैर्यशील माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिपाली सय्यद- भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या ट्रस्टमार्फत करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रात केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, माजी विद्यानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चित्रफित संदेशाद्वा शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSangliसांगली