शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पोलीस करतात सांभाळ लोकसभा, विधानसभेची इव्हीएमचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:21 AM

सध्या सांगलीतील यंत्रे तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीत आहेत. इमारतीचा एक भाग प्रशासनाच्या ताब्यात असल्याने मंडळाचे क्रीडाविषयक उपक्रम खोळंबले आहेत. इमारत रिकामी करून देण्याची विनंती मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्दे पंढरपूर रस्त्यावरील गोदामात नेण्याचा प्रस्ताव

सांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर काही महिने लोटले तरी, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स अद्याप जिल्ह्यातच आहेत. सांगली-मिरजेसह सर्व तालुक्यांतील शासकीय इमारतींत बंदोबस्तात ठेवली आहेत. पोलीस यंत्रणा त्यांची अहोरात्र निगराणी करत आहे.

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये व विधानसभेच्या अॉक्टोबरमध्ये झाल्या. निकाल इव्हीएममध्ये बंदिस्त झाले. लोकसभेची सुमारे १ हजार ८४८ यंत्रे मिरजेतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात बंदिस्त आहेत.विधानसभेची यंत्रे त्या-त्या मतदारसंघांत ठेवली आहेत. मिरजेत वैरण बाजारातील गोदामात ३२६ यंत्रे बंदिस्त आहेत. सांगलीची ३१० यंत्रे तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीत आहेत. जतची २८३, पलूस-कडेगावची २८४, खानापूर-आटपाडीची ३४८, तासगाव -कवठेमहांकाळची २९७, शिराळ््याची ३३४ व इस्लामपूरची २८४ यंत्रे बंदोबस्तात आहेत. एक हवालदार व तीन शिपाई असा पोलीस बंदोबस्त आहोरात्र आहे.जिल्हाभरात विखुरलेली ईव्हीएम एकत्रित ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे, जेणेकरुन त्यामध्ये सुसंगती येईल व बंदोबस्ताचा ताणही कमी होईल. सध्या सांगलीतील यंत्रे तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीत आहेत. इमारतीचा एक भाग प्रशासनाच्या ताब्यात असल्याने मंडळाचे क्रीडाविषयक उपक्रम खोळंबले आहेत. इमारत रिकामी करून देण्याची विनंती मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

...म्हणून इव्हीएम सांभाळून ठेवतातमतमोजणीनंतर सहा महिन्यांपर्यंत ती सांभाळून ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा नियम आहे. लोकसभा मतमोजणीला सहा महिने लोटले; पण देशात अन्यत्र निवडणुका नसल्याने यंत्रांना मागणी आली नाही. विधानसभा मतमोजणीला सहा महिने व्हायचे असल्याने यंत्रे येथेच ठेवली आहेत. एखाद्या मतदारसंघातील मतमोजणीविरोधात कायदेशीर पेच निर्माण झाल्यास यंत्रे व त्यातील तपशील महत्त्वाचा ठरतो. मिरजेतील निकालानंतर उमेदवाराच्या पात्रतेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली गेली, त्यामुळे तेथे इव्हीएम सांभाळून ठेवणे महत्त्वाचे ठरले.

 

जिल्ह्यातील सर्व यंत्रे एकत्रित ठेवण्यासाठी मालगाव हद्दीतील केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम आम्हाला मिळाले आहे. तेथे दुरुस्तीची मोठी कामे करावी लागतील. दुरुस्तीनंतर सर्व यंत्रे पंढरपूर रस्त्यावरील या गोदामात ठेवली जातील’.- डॉ. स्वाती देशमुख-पाटीलनिवडणूक उपजिल्हाधिकारी, सांगली

टॅग्स :VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीनSangliसांगली