ओळ :
दि आष्टा पीपल्स बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष कौशिक वग्यानी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप वग्यानी, बबन थोटे, विराज शिंदे, जयदीप थोटे उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा येथील दि आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली.
बँकेचे अध्यक्ष कौशिक वग्यानी म्हणाले, बँकेच्यावतीने सभासदांना अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्यात येत आहेत. आरटीजीएस, एनईएफटी, मोबाईल बँकिंग, सीटीएस चेक सुविधा, एसएमएस बँकिंग, रूपे डेबिट कार्ड या सेवांचा बँकेच्या सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कोरोना संकटकाळात स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता व्रतस्थ वृत्तीने रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. प्रकाश आडमुठे यांचा ‘कोविड योद्धा धन्वंतरी’ म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी आदर्श शाखा म्हणून अंकलखोप, भोसे व कुपवाड शाखेचे अध्यक्ष, शाखाधिकारी यांच्यासह सुजित वाडकर यांचा आदर्श अधिकारी, सायली कवठेकर यांचा आदर्श लेखापाल व सचिन इंगवले यांचा आदर्श शिपाई पुरस्काराने गौरव करण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष कौशिक वग्यानी, उपाध्यक्ष अनिल मडके तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती मासाळ यांचा ज्येष्ठ सभासदांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष कौशिक वग्यानी यांनी अहवाल वाचन केले. ताळेबंद नफा-तोटा पत्रक वाचन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती मासाळ यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी शेतकरी विणकरी सूतगिरणीचे अध्यक्ष व बँकेचे संचालक बबन थोटे, दिलीप वग्यानी, जयदीप थोटे, अनिल पाटील, विराज शिंदे, दादासाहेब कोरुचे, फंचू हालुंडे, सुनील वाडकर, अजित शिरगावकर, पुरणकुमार माळी, रामचंद्र सिद्ध, विष्णू वारे, उषाराणी आवटी, उषा कवठेकर, विनोद पाटील, अनिल चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संदीप तांबेकर यांनी सूत्रसंचालन केले.