--------------
व्यावसायिकांचे हाल
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे रद्द करावे लागले. त्यामुळे कमाईचे चार महिने हातचे गेल्याने वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
----------------
यात्रांवर परिणाम
खानापूर : कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली जाते.
--------------
वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी
सांगली : वनविभाग व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे, परंतु जिल्ह्यातील वृक्षतोडी होत आहेत. परिणामी, प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
------------------
सांडपाण्याची समस्या
मिरज : शहरातील काही मोकळ्या भूखंडांवरून घाण पाण्याचे डबके, तसेच गटारांचे पाणी साचत आहे. या गटारींच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी, शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे.