शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Sangli: अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल मालकाला १० हजाराचा गंडा, औदुंबरच्या महिलेस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 4:35 PM

दिलीप मोहिते  विटा : अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची बतावणी करीत अन्नात भेसळ होत असल्याचे सांगत विट्यातील एका हॉटेल मालकाला ...

दिलीप मोहिते विटा : अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची बतावणी करीत अन्नात भेसळ होत असल्याचे सांगत विट्यातील एका हॉटेल मालकाला १० हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी संशयित तोतया अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती सुनिल पाटील-थोरात (वय ३६, रा. औदुंबर, ता.पलूस) या महिलेला विटा पोलीसांनी अटक केली आहे.विटा येथील विशाल चंद्रकांत चोथे यांचे कºहाड रस्त्यावर हॉटेल आहे. या हॉटेलात तोतया अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून वावरणारी स्वाती पाटील-थोरात ही वारंवार येत होती. त्यावेळी ती हॉटेल मालकाला अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून तेथे फुकटचे जेवण करीत होती.त्यानंतर सोमवारी (दि. १२) सकाळी पुन्हा हॉटेलमध्ये आली. त्यावेळी तिने अन्नात भेसळ होत असून तुमच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची भिती घातली. तसेच कारवाई नको असेल तर १० हजार रूपयांची मागणी केली. विशाल चोथे यांनी त्या महिलेच्या फोन पे वर १० हजार रूपये पाठविले. त्यानंतर स्वाती पाटील-थोरात ही तेथून निघून गेली.मात्र, हॉटेल मालक विशाल चोथे यांना संबंधित महिलेची शंका आल्याने त्यांनी थेट विटा पोलीस ठाणे गाठून संबंधित स्वाती पाटील-थोरात हिच्याविरूध्द तक्रार दिल्यानंतर बी.एन.एस. कलम ३१८(४), ३१९(२) प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तोतया महिला अधिकारी स्वाती पाटील-थोरात हिला पोलिसांनी अटक केली असून पोलिस उपनिरिक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस