विटा : ‘मी लाभार्र्थी’च्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधिर करीत आहे. जनतेने मते व सत्ता दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.खानापूर तालुक्यातील कार्वे (विटा) येथे रविवारी पार पडलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी जलसंपदामंत्री विजय शिवतारे, आ. अनिल बाबर, खासदार गजानन कीर्तीकर, नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, अमोल बाबर, संजय विभूते, आनंदराव पवार उपस्थित होते.ठाकरे म्हणाले की, जनतेसाठी अच्छे दिन येतील म्हणून भाजपला पाठिंबा दिला. तीन वर्षे झाली. आता मी जेव्हा फिरतोय तेव्हा वाटायला लागले आहे की, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्टÑ माझा?’ महाराष्टÑाची पूर्वीपेक्षा वाईट परिस्थिती झाली आहे. १९९५ च्या जुन्याच पाणी योजना अजून पूर्ण करायचे काम सुरू आहे. महाराष्टÑात नवीन काही तरी घडेल म्हणून जनतेने सरकार बदलले; पण परिस्थिती बदलली नाही. ती बदलायची असेल तर सांगली जिल्हा भगवा करा. मी महाराष्टÑ भगवा करतो. मला मुख्यमंत्री व्हायचे नाही; पण एक ना एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात बसविणारच आहे. शेतकºयांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे.ठाकरे म्हणाले, सरकारला नीट सल्ले देणारे कोणी नाही. वीजदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जाते. हे शेतकºयांचे सरकार आहे की नाही? शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. हे महाराष्टÑाला भूषणावह नाही. भाजपचे सरकार थोतांड असल्याने शेतकरी मुख्यमंत्र्यांपेक्षा माझ्याकडे समस्यांचे ओझे घेऊन मोठ्या अपेक्षेने येत आहेत. शेतकºयांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.आ. अनिल बाबर म्हणाले की, आमच्या मतदारसंघात १३ हजार शेतीपंपांची वीज कनेक्शन मिळाली नाहीत. टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारमध्ये शिवसेनेचा दबावगट तयार करून वीज, शेती, पाणी, आदी प्रश्न सोडविण्याची भूमिका शिवसेनेने सभागृहात घेतली पाहिजे. यावेळी निवास पाटील, दिनकर पाटील, शीतल बाबर, सभापती मनीषा बागल, उपसभापती बाळासाहेब नलवडे, महावीर शिंदे, शेखर माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.‘अनिलभाऊंना ताकद द्या’जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी पक्षाचा आमदार देण्याची ग्वाही आम्ही दिली होती. आता सांगली जिल्ह्यात आ. अनिलभाऊ बाबर यांच्या रूपाने शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वजण त्रास देत आहेत. त्यामुळे ठाकरेंनी आ. बाबर यांना ताकद द्यावी.ंं
फडणवीस, चंद्रकांतदादा हेच खरे लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:22 AM