कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ह्युमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशनमार्फत ‘मासिक पाळी दिन’ साजरा करण्यात आला. या ऑनलाईन वेबिनारला महाराष्ट्रातून १७६ लोकांनी नोंदणी केली होती. डॉ. दीपशिखा दिवाकर म्हणाल्या की, मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी जागतिक पातळीवर दरवर्षी २८ मे हा ‘मासिक पाळी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
मासिक पाळी म्हणजे काय, तसेच मासिक पाळीमध्ये घ्यायची काळजी, आहार यांबाबत त्यांनी माहिती दिली. उपसरपंच शर्मिला घाईल, श्रीमती पी. आर. पाटील, रितू पहानपटे, नीशा पाटील, सुनीता देशमुख, स्वाती टकुडगे, मनीषा भोंगाळे उपस्थित होत्या. अनिकेतन पवार यांनी सूत्रसंचालन केले. रमजान शेख यांनी आभार मानले. अध्यक्षा आरिफा मुजावर, उपाध्यक्षा शोभा माळी, अनुराधा पाटील, ऊर्मिला दशवंत, कीर्ती पवार यांनी नियोजन केले.