शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सांगलीत संस्थानच्या गणपतीला शाही मिरवणुकीने निरोप, दर्शनासाठी तुफान गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 12:27 PM

अवघ्या एक किलोमीटर अंतरासाठी लागले तब्बल तीन तास

सांगली : सुमारे पाच तासांच्या विसर्जन सोहळ्यानंतर संस्थानच्या ‘श्रीं’चे रविवारी रात्री विसर्जन झाले. शाही थाटातील विसर्जन सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी सांगलीकर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून थांबले होते. भूतपूर्व संस्थानिक विजयसिंहराजे पटवर्धन व राजलक्ष्मीराजे या मिरवणुकीत सहभागी झाले होते.राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह संस्थानचा गणेशोत्सव साजरा झाला. रविवारी त्याची सांगता झाली. दुपारी विजयसिंहराजे व राजलक्ष्मीराजे यांनी ‘श्रीं’ची आरती केली. त्यावेळी हजारो सांगलीकरांनी बाप्पाचे दर्शन घेतले. चार वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यात अग्रभागी ढोल-ताशांचा अखंड गजर सुरू होता. ध्वजपथकांचे लयबद्ध नृत्य सुरू होते. पांढऱ्याशुभ्र गणवेशातील तरुण-तरुणी भगवे ध्वज उंचावत होेते. राजवाड्यातून निघालेली मिरवणूक पटेल चौक, गणपती पेठेतून गणपती मंदिराकडे निघाली. अवघ्या एक किलोमीटर अंतरासाठी तब्बल तीन तास लागले.गणपती मंदिरासमोर मिरवणूक काहीवेळ थांबली. ढोल-ताशा पथकांनी मंदिरासमोर रिंगण धरले. त्यानंतर मिरवणूक कृष्णा नदीकडे मार्गस्थ झाली. बाप्पाचे निरोपाचे दर्शन घेण्यासाठी टिळक चौकात तुफान गर्दी झाली होती. पोलिसांनी चारही बाजूंची वाहतूक रोखून धरली होती. आयर्विन पुलावरील वाहतूकही थांबविण्यात आली होती.

रात्री आठच्या सुमारास मिरवणूक सरकारी घाटावर पोहोचली. मिरवणुकीत विजयसिंहराजे आणि राजलक्ष्मीराजे पटवर्धन सहभागी झाले. सोबतच आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, दिगंबर जाधव, जनसुराज्यचे समित कदम, संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर हेदेखील सहभागी झाले होते. घाटावर विजयसिंहराजे यांनी बाप्पांची निरोपाची आरती केली. यावेळी भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात घाट दणाणून सोडला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन झाले.या सोहळ्यासाठी पोलिसांनी शहरभर बंदोबस्त ठेवला होता. काॅंग्रेस भवनपासून आयर्विन पुलापर्यंत सर्वत्र पोलीस तैनात होते. भाविकांच्या उत्साहाला आवर घालण्याचे काम त्यांना करावे लागले. दोन वर्षांच्या खंडामुळे भाविकांचा जल्लोष शिगेला पोहोचला होता. परंतु, कोणताही अनुचित प्रकार न होता शिस्तबद्धरित्या व जल्लोषात विसर्जन सोहळा पार पडला.

पेढ्यांची उधळणसंस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पेढ्यांच्या उधळणीची परंपरा भाविकांनी कायम राखली. मिरवणुकीत तरुण मंडळांनी भाविकांना शिरा, पेढे, लाडू, चुरमुरे, फुटाणे अशा प्रसादाचे वाटप केले.

टॅग्स :SangliसांगलीGanesh Mahotsavगणेशोत्सव