शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

एसटीच्या सेवेतून खासगी शिवशाही गाड्यांना निरोप, ३० जूनच्या रात्री पूर्णत: सेवा बंद

By संतोष भिसे | Published: July 01, 2023 2:03 PM

महामंडळासोबतचा करार न वाढल्याने खासगी शिवशाही गाड्यांना ‘ब्रेक’ लागला

संतोष भिसेसांगली : एसटी महामंडळाला शिवशाही गाड्या पुरविणाऱ्या खासगी कंपनीचा करार शुक्रवारी (दि. ३०) संपुष्टात आला. त्यामुळे प्रवाशांना थंडगार प्रवास घडवणाऱ्या खासगी शिवशाही गाड्या आता राज्यभरातील रस्त्यांवर दिसणार नाहीत. फक्त महामंडळाच्या गाड्याच सेवा देणार आहेत.महामंडळासोबतचा करार न वाढल्याने खासगी शिवशाही गाड्यांना ‘ब्रेक’ लागला. खासगी आरामगाड्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी संपूर्ण वातानुकूलित शिवशाही गाड्यांची संकल्पना एसटी महामंडळाने अंमलात आणली होती. २०१८ पासून राज्यभरात शिवशाहीची दौड सुरू झाली होती. थोड्याफार जादा पैशांत थंडगार व आरामदायी प्रवास करता येत असल्याने प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषत: पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नागपूर आदी मार्गांवर शिवशाही भरभरून धावत होत्या. २०२१ मध्ये करार संपल्याने महामंडळाने तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती, तीदेखील ३० जूनच्या रात्री संपली. गेल्या महिनाभरात कंपनीने १०० गाड्या टप्प्याटप्प्याने एसटीच्या सेवेतून काढून घेतल्या. ३० जूनच्या रात्री पूर्णत: सेवा बंद केली. त्यांचे काही चालक कंत्राटी स्वरूपात एसटीकडे रुजू झाले.

या मार्गावर होती शिवशाहीपुणे-मुंबई, मिरज-सांगली-पुणे, पुणे-नाशिक, कोल्हापूर-पुणे, सोलापूर-पुणे, सातारा-बोरीवली, पिंपरी-पणजी, बार्शी-पुणे, पुणे-महाबळेश्वर आदी मार्गांवर खासगी शिवशाही धावत होत्या. आता तेथे महामंडळाच्या गाड्या धावतील. खासगी गाड्या तुलनेने तंदुरुस्त होत्या, त्यामुळे महामंडळालाही आपल्या शिवशाहीच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

प्रतिकिलोमीटर २९ रुपये शुल्कखासगी शिवशाही गाड्यांना एसटीकडून प्रतिकिलोमीटर २९ रुपये शुल्क दिले जायचे. त्याशिवाय डिझेल पुरवठा आणि वाहक एसटीचा असायचा. गाडीची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता व चालक ही जबाबदारी संबंधित कंपनीची होती.

आता येणार शिवाईखासगी शिवशाहीची उणीव भरून काढण्यासाठी आता शिवाई गाड्या येणार आहेत. काही आगारांत त्या दाखलही झाल्या आहेत. या गाड्या विजेवर धावणाऱ्या असून, संपूर्ण वातानुकूलित आहेत.

खासगी कंपनीने करार संपल्याने गाड्या काढून घेतल्या. त्या मार्गांवर आता महामंडळाच्या गाड्यांचे नियोजन केले आहे. - धनाजी घाटगे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीShivshahiशिवशाही