शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

शेततळे बनताहेत मृत्यूचे सापळे, कृषी विभागाकडून उपाययोजना आवश्यक

By घनशाम नवाथे | Updated: December 9, 2024 12:36 IST

घनश्याम नवाथे सांगली : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बनवण्यात येणारे शेततळे सुरक्षेच्या उपायाअभावी धोकादायक ठरत आहेत. लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) ...

घनश्याम नवाथेसांगली : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बनवण्यात येणारे शेततळे सुरक्षेच्या उपायाअभावी धोकादायक ठरत आहेत. लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे दोन दिवसांपूर्वी दोघा चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शेततळ्यांची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’ देताना सुरक्षेच्या उपाययोजनांची खात्री करणे आवश्यक बनले आहे.

पावसाचे पाणी साठवून ठेवून आपत्कालीन परिस्थितीत ते पिकाला देता यावे, यासाठी शेततळ्यांची संकल्पना राबवली जाते. शेततळ्यातून आवश्यक त्यावेळी पिकांना पाणी देता आल्यामुळे अनेकांना ती वरदान ठरली आहेत. परंतु सुरक्षेअभावी शेततळे म्हणजे मृत्यूचे सापळे बनल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी शेततळ्यात बुडून चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत होत आहे. पट्टीचे पोहणारेदेखील शेततळ्यात पडल्यानंतर बुडून मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.यंदाच्या वर्षात जोंधळखिंडी येथे निवृत्त शिक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मे महिन्यात नेहरूनगर येथे सुटीला आलेल्या दोघा भावांचा मृत्यू झाला. गतवर्षी २०२३ मध्ये बेडगला दोन भावंडे बुडाली. जून २०२३ मध्ये सोनी येथे पोलिस उपनिरीक्षकाचा बुडून मृत्यू झाला. जतमध्ये मोदीमळा येथे मायलेकाचा मृत्यू झाला. प्रत्येक वर्षी अशा दुर्घटना घडताना दिसतात.शेततळ्यासाठी शासकीय अनुदान मिळते. परंतु शेततळ्याभोवती संरक्षक जाळी बांधणे आवश्यक केले आहे. बरीच शेततळी संरक्षक कुंपणाविना मोकळीच असतात. अनेकांना ती पाहून पोहण्याचा मोह होतो. परंतु आतमध्ये गेल्यानंतर वरती येताना दमछाक होते.प्लास्टिकवरून पाय घसरत असल्यामुळे कसरत करावी लागते. तळ्यात गाळ साचल्यामुळेही अनेकांचा अडकून बुडून मृत्यू होतो. पोहायला न येणाऱ्यांबरोबर पोहता येणाऱ्यांसाठीही शेततळी पाण्यात पडल्यानंतर धोकादायक ठरू शकतात.

जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेततळी बनवण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत साडेचार हजारहून अधिक शेततळी आहेत. परंतु यापैकी बरीच शेततळी कुंपणाविना आहेत. तेथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर दुर्घटना टळतील

  • शेततळ्यांना कुंपण घातल्यास लहान मुलांना सहजपणे आतमध्ये जाता येणार नाही.
  • शेततळ्यात पडल्यानंतर वरती येताना काठ निसरडे असल्यामुळे घसरल्यासारखे होते. त्यामुळे दोरीच्या शिड्या किंवा जाड दोऱ्या जागोजागी टाकून ठेवाव्यात.
  • पाण्यात सतत ठेवल्यानंतरही खराब न होणारे ‘फ्लोटर’, इनर, थर्माकोल टाकून ठेवावेत.
  • शेततळ्याभोवती सावधानतेचा इशारा देणारे फलक लावावेत.
  • शेततळ्यावर शक्य असल्यास जाळी टाकावी. त्यामुळे कचरा साचला जाईल. जाळी पाहून कोणी उतरणार नाही.

जागृती हवीशेततळे पाहून बऱ्याच जणांना पोहण्याचा मोह होतो. परंतु शेततळ्याची रचनाच वेगळी असते. पट्टीचे पोहणारे आतमध्ये गेल्यानंतर सहजपणे वरती येऊ शकत नाहीत. त्यासाठी शेततळ्यात कोणी जाऊ नये, यासाठी जागृती आवश्यक ठरते. शेतकऱ्यांवर याची मोठी जबाबदारी येते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र