शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

चार हजार वर्षांपूर्वीची शेतकरी वसाहत सापडली

By admin | Published: April 26, 2016 11:56 PM

संशोधकांना यश : तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडीत अवश्ोष; प्राचीन इतिहासात मोलाची भर

सांगली : प्राचीन इतिहासाचे संशोधक डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथे दक्षिण महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची चार हजार वर्षांपूर्वीची वसाहत शोधून काढली आहे. ताम्रपाषाण युगातील म्हणजेच चार हजार वर्षांपूर्वीची मृद्भांडी, मातृकामूर्ती, लहान मुलांची खेळणी यांचे अवशेष मिळून आले आहेत. या शोधामुळे जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासात मोलाची भर पडली आहे. ताम्रपाषाण युग हे आद्य शेतकऱ्यांचे युग मानले जाते. इसवीसनपूर्व २००० ते इसवीसनपूर्व ९०० या काळात हे युग अस्तित्वात होते. या काळात माणूस प्रामुख्याने शेती करू लागला होता. पशुपालन हा त्याचा जोडव्यवसाय होता. त्याची घरे गोलाकार आणि आयताकृती होती. माणसाच्या मृत्यूनंतर होणारा त्यांचा दफनविधीही वैशिष्ट्यपूर्ण होता. प्रौढांना घराच्या अंगणात दफन करीत, तर लहान मुलांना मातीच्या भांड्यात घालून दफन करीत. या काळात कुंभारकला ही सर्वोच्च टोकाला पोहोचली होती. या काळातील मानव कुंभारकलेत निष्णात होता. त्यामुळे त्याने बनविलेली नक्षीदार भांडी आजही आढळून येतात.ताम्रपाषाण युगाची ही वैशिष्ट्ये दाखविणारी वसाहत तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी गावात अग्रणीकाठी शेतात डॉ. निरंजन कुलकर्णी यांना नुकतीच आढळून आली आहे. आजवर दक्षिण महाराष्ट्रात सातवाहन कालातील अवशेष आढळून आले आहेत. मात्र, त्यापूर्वीचे अवशेष आढळून येत नव्हते. सातवाहनपूर्व काळातील इतिहास आजवर अज्ञातच होता. मात्र, डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी गेली काही वर्षे सातत्याने केलेल्या संशोधनामुळे दक्षिण महाराष्ट्रातील सातवाहनपूर्व काळातील मानवी वसाहतींचा शोध लागला आहे. आजवर भीमा नदीच्या खोऱ्यात आणि कर्नाटकात विजापूर जिल्ह्यात ताम्रपाषाण काळातील अवशेष मिळाले होते. मात्र, या दोन्ही प्रदेशांचा सहसंबंध अज्ञात होता. सिद्धेवाडी येथे सापडलेल्या ताम्रपाषाणयुगीन अवशेषांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तत्कालीन दुवा निश्चित झाला आहे.सिद्धेवाडी येथे डॉ. कुलकर्णी यांना ताम्रपाषाण युगाची वैशिष्ट्ये असणाऱ्या लाल रंगाच्या भांड्याचे तुकडे मिळाले असून, त्यावर काळ्या रंगाने नक्षीकाम केले आहे. एक स्त्रीप्रतिमाही मिळाली आहे. त्याशिवाय खेळण्याचे काही अवशेष, सुक्ष्मास्त्रे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गारगोटीचे दगडही अग्रणी नदीच्या काठावर मिळाले आहेत. या शोधामुळे दक्षिण महाराष्ट्रात विशेषत: सांगली जिल्ह्यात सुमारे चार हजार वर्षांपूर्वी नांदत असलेल्या आद्य शेतकऱ्यांच्या वसाहतीची माहिती मिळाली आहे. जिल्ह्याच्याच नव्हे, तर दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासात या शोधामुळे भर पडणार आहे. याठिकाणी उत्खनन करून प्राचीन इतिहासाचा अधिक अभ्यास करण्याचा मानस डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)निरंजन कुलकर्णी यांच्याकडून १०३ ठिकाणांचा शोधडॉ. निरंजन कुलकर्णी हे प्राचीन इतिहासाचे गाढे अभ्यासक असून, त्यांनी डेक्कन कॉलेजमधून पुरातत्व विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. सध्या ते हातकणंगले येथे अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णेच्या उर्ध्व खोऱ्यातील प्राचीन वसाहतींचा ते गेली अनेक वर्षे अभ्यास करीत आहेत. आजवर त्यांनी सातवाहनकालीन सुमारे १०३ ठिकाणे शोधली आहेत. या संशोधनासाठी त्यांना भारतीय इतिहास अनुसंधान केंद्राचे साहाय्य लाभले आहे.