शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

शेतकरी नेत्यांची वाताहत, राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 6:02 PM

अशोक पाटील इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास ...

अशोक पाटीलइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास आले. आता प्रत्येकाने वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण सुरु केले आहे. परंतु राज्यातील बदलणाऱ्या राजकीय घडामोडीत या नेत्यांची वाताहत होत चालली आहे.महाराष्ट्रात दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. कांदा आंदोलनानंतर जोशी यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण महाराष्ट्रात राजू शेट्टी (कोल्हापूर), रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत, बी. जी. पाटील (सांगली) यांनी ऊसदर आंदोलनच्या माध्यमातून शेतकरी संघटनेला उभारी दिली. त्यानंतर जोशीप्रणीत शेतकरी संघटनेत फूट पडली. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नव्याने स्थापना केली. या संघटनेत सदाभाऊ खोत यांना सेनापतीपद देण्यात आले होते.रघुनाथदादा पाटील यांनी शेट्टी यांचे नेतृत्व झुगारत आजअखेर शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर कायम ठेवला. दुसरीकडे सत्तेच्या मोहापायी शेट्टी आणि खोत यांच्यातील दरी रुंदावली. शेट्टी सुरुवातीस भाजपसोबत आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन करून भाजपशी सोबत केली. दोघांनी आपापल्या संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्या. स्वतःची वाताहत करून घेतली. आता शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. खोत यांनी भाजपचा अजेंडा रेटण्याचाच प्रयत्न चालू ठेवला आहे.रघुनाथदादा यांनी शेतकरी संघटना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या छत्रछायेखाली नेऊन ठेवली. आगामी काळात शेट्टी व खोत यांच्या संघटनांना शह देण्याच्या प्रयत्नात ते आहेत. या सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला राहिले, आता संघटनेसह त्यांचीही वाताहत सुरू आहे.

शेतकरी संघटनेची वाताहत २००४ पासूनच सुरू आहे. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच लढणार आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या भूमिकेतून राजकारण करणार आहोत. त्यांच्या आदेशाने आगामी निवडणुका लढविण्याचा विचार आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून ८ ऑगस्ट रोजी पुन्हा राव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणFarmerशेतकरी