सांगली : शेतकरीविरोधी विधेयक संसदेत गोंधळात मंजूर करून केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना त्रास दिला. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत. भाजपच्या या भूमिकेला नागरिक कंटाळले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मिरजेत केला.महाविकास आघाडी पुरस्कृत वसंतदादा शेतकरी पॅनेलच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, मनोज शिंदे-म्हैसाळकर, जयश्री पाटील, बाळासाहेब होनमोरे, अविनाश पाटील, पृथ्वीराज पाटील, दिनकर पाटील प्रमुख उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची कोंडी करणाऱ्या पक्षाचे लोक शेतकरी हिताच्या गप्पा करत आहेत. लोक त्यांना योग्य जागा दाखवतील.महाविकास आघाडीचे सर्व नेते एकसंध : कदममिरज तालुक्यातील बेडगसह काही गावांतील बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी एकसंध राहून शेतकऱ्यांमध्ये विश्वास दिला आहे. बाजार समितीसह यापुढील सर्वच निवडणुकीत विजय मिळविणार आहे, असा विश्वास काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.भ्रष्टाचाऱ्यांना बाजूला सारून नव्यांना संधीविशाल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. नक्की नवीन चेहरे बाजार समितीचा आदर्श कारभार करतील यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.नाराजी दूर, उमेदवारांनी सोडला नि:श्वासमिरज तालुक्यातील नाराज झालेले नेते आणि कार्यकर्तेही मेळाव्याला हजर राहिले. किरकोळ नाराजी होती, ती संपली, असे अनेकांनी जाहीर केल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 3:46 PM