ते म्हणाले की, आमदार विक्रम सावंत यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात उमदी येथून वर्षापूर्वी केली होती. परंतु कोरोनामुळे या उपक्रमात अडथळा निर्माण होऊन अद्याप काही लोकांची कागदपत्रे, दाखले, रेशनकार्ड अशी अनेक शासकीय कामे थांबली आहेत. त्यामुळे आम्ही आमदार विक्रम सावंत यांच्याकडे पुन्हा एकदा उमदी येथे शेतकरी समाधान मेळाव्याचे आयोजन करून मेळाव्याच्या ठिकाणीच सर्व शासकीय कामे करून मिळावीत अशी मागणी केली होती. आमदार सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना २७ फेब्रुवारी रोजी उमदी येथे तर २८ रोजी करजगी येथे शेतकरी समाधान मेळावा घेण्याच्या सूचना दिल्या. या मेळाव्यात सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून शेतकरी व सर्वसामान्य जनतेची तत्काळ कामे केली जातील, असे मुल्ला यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे, बंडा शेवाळे, संतोष अरकेरी, उमेश पुजारी, सिद्धू बगली, शेट्याप्पा इम्मणवर उपस्थित होते.