ते म्हणाले, प्राणिशास्त्र विभागाने सुरू केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांची पाने व कचरा यापासून उत्कृष्ट गांडूळ खत होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता केल्यानंतर जमा झालेला कचरा एकत्र करून त्यापासून गांडूळ खत तयार केले जाते. या खताचे वाटप तासगाव परिसरातील गरजू शेतकऱ्यांना केले जाणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या बागेसाठी या खताचा उपयोग केला जाणार आहे. तासगाव परिसरातील शेतकरी आणि महाविद्यालयातील सेवकवर्ग यांना प्राणिशास्त्र विभागामार्फत गांडूळ खत निर्मितीचे मार्गदर्शन केले जाणार आहे. गांडूळ खताच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो, जमीन भुसभुशीत होते, उत्पादन वाढते, सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कसलाही रासायनिक पदार्थ न वापरता उत्पादन वाढते त्यामुळे आरोग्यावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. पर्यावरणाचा समतोल साधला जातो. गांडूळ खताचा वापर फळझाडांच्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढीसाठी उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या गोठ्याला जोडून गांडूळ खत प्रकल्प तयार केला तर त्याचा फायदा होईल. कमी कालावधीत, कमी श्रमात उत्कृष्ट गांडूळ खत तयार करता येईल याविषयी अधिक माहितीसाठी प्राणिशास्त्र विभागाशी संपर्क साधावा.
प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. ए. खाबडे यांनी स्वागत केले. डॉ. पी. बी. तेली यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डी. व्ही. पाटील, डॉ. प्रतीक्षा भंडारे, प्रा. पूनम पाटील, प्रा. शैलजा कुसरकर, प्रा. चैताली गवळी, राजू कोळी, बाबासो कागवाडे, प्रकाश बुकशेठ उपस्थित होते.