शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

राज्यात भू-विकास बँकांच्या कर्जमाफीचा भूलभुलैया, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 5:15 PM

भाजप सरकारच्या काळातही असाच पोकळ निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.

सांगली : राज्यातील भू-विकास बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन १० महिने उलटले तरी, अद्याप त्याबाबत कोणताही लेखी आदेश निघाला नाही. भाजप सरकारच्या काळातही असाच पोकळ निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. कर्जमाफीचा हा भूलभुलैया संपून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्यातील भू-विकास बँकेतील ३४ हजार ७७८ थकबाकीदार कर्जदारांचे ९६४ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १८ ऑगस्ट २०२१ रोजी मंत्रालयातील एका बैठकीत दिले होते. तसेच ११ मार्चरोजी विधानसभेतही त्यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरातील भू-विकास बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. आता दहा महिन्यांनंतर त्यांच्या पदरी निराशा आली आहे.भाजप सरकारच्या काळात भू-विकास बँकांच्या प्रश्नावर मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली होती. त्यात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे, तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होता. भाजप सरकारनेही कर्जमाफी योजनेची घोषणा केली, पण लेखी आदेश काढले नाहीत. समितीने राज्यातील भू-विकास बँकांच्या मालमत्तांच्या हस्तांतराची घोषणा केली होती. त्यांनीही पूर्ण सत्ताकाळात या घोषणेची अंमलबजावणी केली नाही.

महाविकास आघाडीकडून बँक कर्मचारी संघटनेसह शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केला होता. प्रत्यक्षात शेतकरी प्रतीक्षा करून थकले तरी, कर्जमाफीचा आदेशही आला नाही.

कर्मचाऱ्यांना मिळणारा दिलासाही क्षणिकराज्यातील भू-विकास बँकांच्या कर्मचारी संघटनेनेही प्रदीर्घ काळ शासनाशी संघर्ष केला. थकीत वेतन व अन्य अशी २७५ कोटी रुपयांची कर्मचाऱ्यांची देणीही भागविण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते. त्याबाबतही ठोस पाऊल शासनाने टाकले नाही. त्यामुळे हा प्रश्न तसाच लटकला आहे.

बँका वाचविण्यासाठी प्रयत्नच नाहीत

राज्यातील भू-विकास बँका वाचविल्या जाऊ शकतात, याबाबत चाैगुले समितीने काही शिफारसीही केल्या होत्या, मात्र कोणत्याही सरकारने ना बँका वाचविण्यासाठी पावले उचलली ना थकीत कर्ज व कर्मचाऱ्यांची देणी भागविण्यासाठी ठोस निर्णय घेतला.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकFarmerशेतकरी