शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विलासराव जगतापांचे पोलिसांविरोधात उपोषण

By admin | Published: March 06, 2017 11:56 PM

जत, उमदी ठाण्यांवर हप्तेखोरीचा आरोप : गुंडगिरी पोसण्याविरुद्ध विधानसभेत आवाज उठवणार

जत : जत आणि उमदी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना विविध बेकायदेशीर व्यवसायातून अनधिकृत उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे येथील अधिकारी सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्याऐवजी गुंडगिरीला पोसण्याचे काम करीत आहेत, असा आरोप आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी केला. या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तालुक्यातील जत व उमदी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबाबत भाजप व मित्रपक्षांच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यावेळी आ. जगताप बोलत होते. ते म्हणाले की, जत व उमदी येथील पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आम्ही पुराव्यासह वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. जत पोलिस ठाण्यास अठरा लाख, तर उमदी पोलिसांना दरमहा चौदा लाख रुपये मिळतात. गुन्हे अन्वेषण विभागामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. जर या चौकशीत तथ्य आढळून आले नाही, तर मी चुकीचे आरोप केले आहेत, म्हणून माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. सध्या आम्ही आमच्या तलवारी म्यान केल्या आहेत. जर आमच्या मागणीची दखल घेऊन वरिष्ठांनी योग्य कारवाई केली नाही, तर त्या बाहेर काढाव्या लागणार आहेत. जत तालुक्यातील प्रस्थापितांची एकेकाळी होत असलेली गुंडगिरी मोडून काढून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वत: देखील गुंडगिरी केली आहे. जिल्हा परिषद निवडणूक प्रचार कालावधित जत आणि उमदी पोलिसांनी सर्वाधिक त्रास भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. आमच्या कार्यकर्त्यांविरोधात कडक कारवाई केली, तर विरोधकांवर जुजबी कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी उमदी येथील बाजार समिती जमीन खरेदी प्रकरणात ७५ लाख रुपये मिळविले आहेत. जत तालुक्यात वाळू उपसा करण्यास पर्यावरण विभागाची बंदी असताना, महसूल विभागाच्या मूक संमतीने वाळू उपसा होत आहे. त्यामुळे येथे पाणी टंचाई जाणवत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सुरुवातीस बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी स्वागत केले. यानंतर भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रवींद्र आरळी, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, अ‍ॅड. प्रभाकर जाधव, उमेश सावंत, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे, शिवाजीराव ताड, डी. एस. कोटी, राजू मांगलेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता पवार, मंगल जमदाडे, स्नेहलता जाधव, शिवाप्पा तावशी, आप्पासाहेब नामद, रामाण्णा जीवन्नवार, श्रावण पाथरुट, माणिक वाघमोडे यावेळी उपस्थित होते. सरदार पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)