इस्लामपूर : केंद्रातील सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून इस्लामपूर येथे बुधवारी शेतकरी समन्वय समितीच्यावतीने एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात हे उपोषण करण्यात आले.
सरकारने हुकूमशाही पद्धतीने केलेले शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत आणि किमान आधारभूत किमतीचा कायदा करावा, यासाठी शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करीत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. या आंदोलकांनी २३ तारखेला ''शेतकरी दिना''निमित उपोषणाचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत येथे शेतकरी समन्वय समितीच्यावतीने उपोषण करण्यात आले. यावेळी तरुण आंदोलकांनी चळवळीची गाणी सादर केली.
यावेळी कॉ. धनाजी गुरव, आरफन शेख, प्रा. विश्वास सायनाकर, अजय सकटे, मारुती रोकडे व अहमद मुंडे, शेकापचे प्रा. एल. डी. पाटील, बसपाचे लहू वाघमारे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक खंडेराव जाधव, बळीराजा संघटनेचे बी. जी. पाटील, दीपक कोठावळे, उमेश कुरळपकर, प्रा. सतीश चौगुले, डॉ. दिलीप सावंत सहभागी झाले होते.
फोटो २३१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर उपोेषण न्यूज :
इस्लामपूर येथे दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रा. विश्वास सायनाकर, कॉ. धनाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.