शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आष्टयानजीक एस.टी बस, ट्रकचा भीषण अपघात; विद्यार्थ्यासह १४ जण जखमी, ट्रक चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 6:38 PM

धडक देऊन ट्रक सुमारे २०० मीटर वर जाऊन थांबला

सुरेंद्र शिराळकरआष्टा : आष्टयानजीक एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एस.टी बसमधील विद्यार्थ्यासह १४ जण जखमी झाले. जखमींना आष्टा ग्रामीण रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले. हा अपघात आज, सोमवार दुपारच्या सुमारास घडला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर-सांगली एसटी बस (एम.एच.२०-बी.एल.-०२३५) आष्टा नजीक शिंदे मळ्याजवळ आली असता समोरून  येणाऱ्या मालवाहतूक ट्रक क्रमांक (एम.एच.२६ बी.डी.४९४९)ची एसटीला भीषण धडक झाली. या धडकेत एसटीच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. धडक देऊन ट्रक सुमारे २०० मीटर वर जाऊन थांबला असता चालकाने तेथून पलायन केले. या धडकेत एसटीमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातात साक्षी तानाजी गायकवाड (वय १८), सुभान शहा (१८), स्वप्निल संजय अवताडे (१८), यशराज विजय कुंभार (१९), संकेत दिलीप वडगावकर (१९), जयश्री दत्तात्रय शिंदे (५५, सर्व रा. आष्टा), चालक हरून हसीन मुलानी  (५३ रा पेठनाका), नदीम इकबाल आगा (४२, रा. इस्लामपूर), पार्वती आत्माराम पवार (६०, रा. कराड), शारदा बळवंत गुरव (६०) बळवंत शंकर गुरव (६५, दोघे रा. सांगलीवाडी), शुभांगी अमर गुरव (३२ रा. शिगाव), अनुसया संपत गुरव (५० रा. शिगाव) व राजश्री दिलीप शिंदे (४८ रा. आष्टा) अशी जखमींची नावे आहेत.अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, संजय सनदी, इस्लामपूरच्या सहायक वाहतूक अधिकारी वासंती जगदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमी प्रवाशांची विचारपूस केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे, भाजपचे प्रवीण माने यांच्यासह नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात गर्दी केली होती.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातStudentविद्यार्थी