सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगाव येथे अग्रणी नदीत बुडून रविवारी पहाटे योगेश पवार (वय ३२) व त्यांची मुलगी श्रेया पवार (७) यांचा मृत्यू झाला. योगेश यांचा पुतण्या या घटनेतून बचावला.कवठेमहांकाळ तालुक्यातील सततच्या पावसाने मोरगाव येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. रविवारी योगेश पवार हे मुलगी श्रेया व पुतण्या ओेंकार पवार असे तिघेजण देशिंगहून कवठेमहांकाळकडे देवीच्या आरतीसाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मोरगावमधील पुलावरून पाणी वाहत होते. त्यातून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने, दुचाकीसह तिघेही वाहू लागले. ओंकार हा पोहत बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. सायंकाळी उशिरा बाप-लेकीचा मृतदेह सापडला.
बाप-लेक अग्रणी नदीत गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 11:35 PM