सांगली : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी नुकतेच सांगलीतील विद्युत खांब व अन्य ठिकाणचे झेंडे, फलक व जळमटे काढून स्वच्छता मोहिमेअंतर्गत काम केले. मात्र या मोहिमेत त्यांनी अन्य सर्वच पक्षांचे झेंडे, फलक हटविताना भाजपच्या झेंड्यांना आणि फलकांना हातसुद्धा लावला नाही.
इतकी भीती त्यांनी या झेंड्याबद्दल बाळगली होती.सांगलीच्या बापट बाल शाळेजवळील चौकात दुपारी महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी याठिकाणच्या विद्युत खांबांवरील फलक व झेंडे हटविण्यास सुरुवात केली. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर झेंडे लागले होते. त्यात माकप व भाजपच्या झेंड्यांची संख्या अधिक होती.
काही राजकीय पक्षांचे तसेच खासगी दुकानदारांचे, व्यावसायिकांचे फलकही लागले होते. कर्मचाऱ्यांनी एका मोठ्या काठीने माकपसहीत सर्व झेंडे व फलक काढून कचऱ्यात टाकले, मात्र त्यांनी भाजपच्या झेंड्याला स्पर्शसुद्धा केला नाही. चार ते पाच नागरिकांनी त्याबद्दल कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावर कर्मचारी गप्प राहिले. शेवटी वारंवार याबाबत विचारणा झाल्यानंतर तो कर्मचारी संतापला. ‘तुम्हाला दुसरे काही काम नाही का?’, असा सवाल करून तो पुढील मोहिमेस निघून गेला. चार-पाच नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हा अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेतील दुजाभाव प्रत्यक्ष पाहिला. त्यांच्यात याविषयी चर्चाही झाली.सत्ता कॉँग्रेसची : अभय भाजपलासांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सध्या कॉँग्रेसची सत्ता आहे. विरोधात राष्टÑवादी आणि स्वाभिमानी विकास आघाडी आहे. भाजपचे अस्तित्व महापालिकेत नगण्य आहे. तरीही कर्मचाºयांना भाजपला अभय द्यावेसे का वाटले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे त्याचा प्रभाव महापालिकेतही दिसू लागला आहे.