सांगली : सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याचे आगमन झाल्याच्या बातमीने पंचक्रोशीत हौशी व उपद्रवी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. बिबट्यासोबतच वन विभाग आणि प्राणीप्रेमींसाठीही ही बाब चिंतेची बनू लागली आहे. दररोज रात्री या भागात प्रखर दिवे लाऊन रात्रभर वाहनांची वर्दळ सुरु झाली आहे.बिबट्या व ग्रामस्थ यांच्या सहजीवनाविषयी वन विभागाच्या पुढाकाराने कार्यशाळा घेण्यात येत आहेत. प्राणीप्रेमींकडून जागृती केली जात आहे. कार्यशाळेदरम्यान प्रकर्षाने जाणवले की, दिड-दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असतानाही त्याला फक्त तिघा-चौघांनीच प्रत्यक्ष पाहिले आहे. त्याने आतापर्यंत कोणाचेही पाळीव जनावर गायब केलेले नाही किंवा मारलेले नाही. तो माणसांना व मानवी वस्तीला टाळत आहे.बिबट्याविषयी अफवांचा मात्र सुळसुळाट झाला आहे. दररोज कोठे ना कोठे त्याला पाहिल्याच्या किंवा रस्त्यात आडवा आल्याच्या बातम्या पसरताहेत. त्याच्या खातरजमेसाठी ठिकठिकाणी कॅमेरे लाऊनही तो पुन्हा-पुन्हा दिसलेला नाही.
वन विभागाच्या कॅमेऱ्यांत एकदाच बिबट्या दिसल्या. वन विभागाच्या कॅमेऱ्यांत एकदाच दिसला. काही हौशी व अतिउत्साही ग्रामस्थ रात्रभर प्रखर प्रकाशझोताच्या दिव्यांसह दाट झाडीच्या रस्त्यावरुन फिरत आहेत. बाहेरुनही लोक येऊ लागल्याने गर्दी वाढली आहे. ही गर्दी निरुपद्रवी बिबट्यासाठी त्रासदायक ठरु शकते असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
रात्रीच्या अंधारात एक-दोन सेकंदांसाठी दिसलेला प्राणी कोणता आहे हे ठामपणे कोणीही सांगू शकलेले नाही. बिबट्या एका जागी फार काळ थांबत नसल्यानेही आठ कॅमेरे लाऊनही पुन्हा दिसलेला नाही.हरणे आणि साळींदरवर गुजराणहा बिबट्या मादी जातीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सागरेश्वर अभयारण्यातील हरणे व साळींदरवर त्याची गुजराण सुुरु असावी. एरवी हरणांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी करणारे शेतकरी आता मात्र बिबट्याच्या अस्तित्वावर वन विभागाकडे दाद मागू लागले आहेत.