शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

पाणीबाणीमुळे उद्योगांमधील उत्पादन थांबण्याची भीती; ८ नळयोजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 8:30 PM

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे ...

ठळक मुद्दे प्रकल्पांमधील उत्पादन प्रक्रीयेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र पाणी पुरठाच बंद झाल्याने उद्योजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून रत्नागिरी एमआयडिसीने ग्रामपंचायतीना होणारा पाणी पुरवठा थांबविला आहे.

एमआयडिसीमधील पुरवठाही बंद आहे. त्यामुळे अनेक औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने काही उद्योगांमधील उत्पादन थांबल्याचेही सांगण्यात आले. तर ८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात पाणीबाणी निर्माण झाली असून नळपाणी योजना ठप्प झाल्या आहेत.

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडिसी ही जिल्ह्यातील मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. येथे काही मोठे कारखाने आहेत. त्यामध्ये अनेकांना रोजगारही मिळाला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या टॅँकरच्या अपघातानंतर येथील उद्योगांमधील काम ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रकल्पांमधील उत्पादन प्रक्रीयेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र पाणी पुरठाच बंद झाल्याने उद्योजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून व्यावसायिकही खासगी टॅँकरचे पाणी मोठ्या प्रमाणात विकत घेत आहेत. मात्र त्यातून अनेक व्यवसायांची पाण्याची गरज काही प्रमाणात भागवली जात आहे. काही उद्योगांच्या परिसरात बोअरवेलचे पाणी मिळत आहे. येत्या चार दिवसात औद्योगिक वसाहतीमधील पाणी पुरवठा सुरू न झाल्यास पाण्याच्या वापरातून उत्पादन होत असलेल्या अनेक उद्योगांमधील उत्पादन प्रक्रीया ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.

औद्योगिक वसाहतीची पाणी समस्या गंभीर बनलेली असतानाच एमआयडिसी पाणी पुरवठा करीत असलेल्या कुवारबाव, मिरजोळे, नाचणे, कर्ला, शिरगाव, मिºयासह आठ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातही अभूतपूर्व पाणी टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. ज्यांच्या विहिरी आहेत त्यांना टंचाईची झळ कमी बसत असली तरी असंख्य कुटुंब केवळ नळपाणी योजनेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचे खुपच हाल होत आहेत.

खासगी टॅँकरकडून पुरवठापाणी टंचाईमुळे खासगी टॅँकरचे पाणी विकत घेणे हाच अनेकांसमोरील एकमेव पर्याय ठरत आहे. त्यामुळे खासगी वाहनातून टॅँकरने पाणी पुरवठा करणाºयांकडे पाणी मागणी करणाºयांची संख्या वाढली आहे. परिणामी टॅँकरचे पाणीही वेळेत मिळत नसल्याची स्थिती आहे. समस्या लक्षात घेऊन खासगी टॅँकरने पाणी पुरवठा करणारेही जनतेला सहकार्य करीत आहेत.

टॅँकरने पाणी पुरवाएमआयडिसीने पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार असल्याची दवंडी रीक्षातून देण्यात आली. मात्र आपत्कालिन स्थितीत गावातील नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था करण्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. अजून किती काळ पाणी मिळणार नाही, याबाबत निश्चिती नसल्याने ग्रामपंचायतीने प्रभागांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकRatnagiriरत्नागिरी