शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

राष्ट्रीय जाहिरातदिनी मान्यवरांचा सत्कार

By admin | Published: October 14, 2015 11:19 PM

शेखर गायकवाड : जाहिरात क्षेत्राने नव्या पिढीला संवेदनशील बनवावे

सांगली : गेल्या पाच-सहा महिन्यात जिल्हा समजावून घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा कारागृहास भेट दिली. त्यावेळी २०-२० वर्षांचे तरुण गुन्हेगारीकडे जास्त वळल्याचे दिसून आले. हे चिंताजनक आहे. जिल्हा कारागृहात ३८० कैद्यांपैकी १०८ जण खुनाचे गुन्हेगार आहेत. यामध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. सांगली जिल्ह्याचा क्राईम रेट इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. प्रसारमाध्यमे आणि जाहिरात क्षेत्राने नवीन पिढीमध्ये संवेदनशीलता आणली पाहिजे. आज जाहिरात व माध्यमांमधील तपस्वी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्याकडील कला ही दैवी देणगीच आहे. माणसाने पिढीगणिक प्रगती करणे अपेक्षित आहे. मात्र तसे दिसत नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले. राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त जाहिरात एजन्सीज्च्या ‘आसमा’ व ‘फेम’ या संघटनांच्यावतीने जाहिरात व माध्यम क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड बोलत होते.सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार अरुण नाईक म्हणाले, आजच्या काळात जाहिरातीचे क्षेत्र प्रभावी बनत आहे. त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जाहिरात ही आज व्यवसाय वृद्धीच्यादृष्टीने गरज बनली आहे. यावेळी कलाभुवनचे तात्यासाहेब वेदपाठक, ज्येठ पत्रकार बापूराव खराडे, ज्येष्ठ पत्रकार अरुण नाईक, मीना आर्टस्चे सुधीर व दिलीप गोखले, आर्ट सेंटरचे शरद आपटे यांचा सत्कार करण्यात आला.‘फेम’चे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल सदस्य महेश कराडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ‘आसमा’चे उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ यांनी आभार मानले. यावेळी ‘पाणी वाचवा’ या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्यातील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन चतुरंग अ‍ॅडव्हर्टायझिंगचे महेश कराडकर, प्रशांत कुलकर्णी, नुपूर अ‍ॅडस्चे उमेश देसाई, प्रमोद गोसावी, चौफेर क्रिएशनचे अमोल मद्वाण्णा, प्रतिसाद अ‍ॅडव्हर्टायझिंगचे प्रकाश हुलवान, सुनील बेलेकर, अ‍ॅड सेंटरचे अमित आपटे, मंजुषा आपटे, गणेश अ‍ॅडस्चे धनंजय गाडगीळ, सन अ‍ॅडव्हर्टायझिंगचे सुधीर अनंतपूरकर, आदर्श अ‍ॅडस्चे भालचंद्र लिमये, विजय पब्लिसिटीचे विजय पडियार, रिसोेर्सेसचे राजेश शहा, एम. एम क्रिएशनचे अनिरुद्ध गुमास्ते यांनी केले. यावेळी जाहिरात, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जाहिरात दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी डावीकडून पहिल्या ओळीत धनंजय गाडगीळ, दिलीप गोखले, महेश कराडकर, उमेश देसाई, राजेश शहा. त्यानंतर खालील बाजूस प्रमोद गोसावी, सुधिर गोखले, बा. द. खराडे, अरुण नाईक, तात्यासाहेब वेदपाठक, शरद आपटे .