सांगली : मिरज तालुक्यातील तुंग येथे खताच्या गुदामाला आग लागली. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास बसथांब्याजवळ ही घटना घडली. यात लाखो रुपयांची हानी झाल्याची शक्यता आहे. या घटनेची रात्री उशिरापर्यंत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. महापालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी होते. जिवंधर कोळसे यांचे तुंगमध्ये खताचे गुदाम आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास गुदामातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी याची दिली. त्यानंतर तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेची उशिरापर्यंत ग्रामीण पोलिसांत नोंद नव्हती. त्यामुळे आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
तुंगमध्ये खताच्या गुदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:26 AM