शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

तापामुळे येणारे झटके-बाल स्वास्थ

By admin | Published: March 01, 2017 12:15 AM

छोट्या मुलांना ताप येणे हा वरचेवर येणारा प्रसंग असल्याने ज्यांच्या घरी लहान मुले आहेत,

दीड वर्षाच्या राहुलला त्याचे आई-वडील व नातेवाइकांनी घाईघाईने बालरोगतज्ज्ञांकडे आणले. त्याला चांगलाच ताप होता. राहुलला फिट आल्यासारखे झटके येत होते. अशा स्वरुपाचा पहिलाच प्रसंग असल्याने याप्रसंगी काय करायचे असते याची पालकांंना मुळीच कल्पना नव्हती; मात्र बालरोगतज्ज्ञांसाठी असा प्रसंग आठ-पंधरा दिवसांतून एकदा तरी येतच असतो. आज या आजाराची माहिती करून घेऊया.साधारणपणे पाच वर्षांखालील पाच ते सहा टक्के मुले पटकन वाढणाऱ्या तापासाठी अतिसंवेदनशील असतात. त्यांना जर अल्पकालावधीमध्ये ताप पटकन वाढला तर झटके येऊ शकतात. त्याला तापामुळे आलेले झटके असे म्हणतात. झटका हा आजार नसून, ते आजाराचे एक चिन्ह आहे. क्वचित प्रसंगी मेंदूज्वर, मेंदूचा जंतूसंसर्ग, मेनिंजायटीस, जपानी मेंदूज्वर, मेंदूचा क्षयरोग अशा गंभीर स्वरुपाच्या आजारामध्येही ताप व झटके येऊ शकतात. तथापि, मेंदूचा जंतूसंसर्ग झाला नसताना केवळ शीघ्रगतीने वाढत जाणाऱ्या तापामुळे येणाऱ्या झटक्यांना तापामुळे येणारे झटके असे म्हणतात. बऱ्याच मुलांना असे झटके येत असतात. अशा मुलांच्या भावंडांना, त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या लहानपणी असे तापातील झटके येत असल्याचा इतिहास दिसून येतो. या तापामुळे येणाऱ्या झटक्यामुळे मुलाच्या मेंदूवर कायमस्वरूपी दुष्परिणाम झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे अशा झटक्यांबाबत फार काळजी करण्याचे कारण नाही. अशा प्रसंगी पालकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती असल्यास अनावश्यक चाचण्या, हॉस्पिटलमधील अ‍ॅडमिशन्स व औषधोपचार टाळता येणे शक्य आहे.छोट्या मुलांना ताप येणे हा वरचेवर येणारा प्रसंग असल्याने ज्यांच्या घरी लहान मुले आहेत, अशा पालकांनी घरामध्ये कायम थर्मामीटर व तापाचे औषध ठेवावे. ताप आल्यावर तो दर तीन-चार तासाला थर्मामीटरने मोजून पाहावा. ताप १०० अंशांच्या पुढे गेल्यास मुलाच्या वयानुसार तापाच्या औषधाचा प्रमाणित डोस देऊन ताप कमी करता येईल. दोन दिवसांनंतर ताप राहिल्यास डॉक्टरांकडे जाऊन तापाच्या कारणांचा शोध घेऊन पुढील उपचार देता येईल. त्यातून बाळाला झटके आल्यास घाबरून जाऊ नये. बहुतांशवेळी असा झटका दोन ते पाच मिनिटांमध्ये विना उपचारदेखील थांबतो. मुलाला एका कुशीवर वळून ठेवल्यास त्याच्या तोंडामधील फेस श्वसननलिकेमध्ये अडकून गुंतागुंत होणार नाही. झटका थांबल्यानंतर अर्धा पाऊण तास बाळ झोपेत वा गुंगीत असते. त्यानंतर ते पूर्ण जागे होऊन खेळू लागते. झटका आला असताना डोक्यावर पाणी मारणे, कांदा, चप्पल हुंगविणे, तोंडात बोट, चमचा घालणे असे प्रकार बाळाला धोका उत्पन्न करू शकतात. अशा उपायांचा झटका थांबविण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. अशा प्रसंगी या बाळाला ताबडतोब पळवत डॉक्टरांकडे नेण्याची गरज नाही. कारण बाळ डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत त्याचा झटका थांबलेला असतो. मात्र, झटका थांबल्यानंतर शांतपणे डॉक्टरांकडे जाऊन झटका येण्याची इतर गंभीर कारणे नाहीत ना याची खात्री करावी. एका तापामध्ये झटका आलेल्या बाळाला वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत परत असा झटका येण्याची शक्यता असल्याने पालकांनी जागरूक राहावे.शरीराच्या ठराविक भागामध्ये येणारे सीमित झटके, १५ मिनिटांपेक्षा प्रदीर्घ काळ येणारे झटके, तापाच्या एकाच कालावधीमध्ये अनेकवार झटके येणे, झटका येऊन गेल्यावर तासाभरानंतरही बाळ गुंगीत असते अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घेणे योग्य ठरेल. हा इतर कारणांमुळे आलेला झटका असू शकतो. बाळाला झटका येणे ही घटनाच मुळी पालकांना घाबरवून टाकण्यास पुरेशी असते. मात्र, याविषयी पालकांना पुरेसे आरोग्य शिक्षण असल्यास अनावश्यक काळजी कमी करता येईल. --- डॉ. मोहन पाटील