शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

झेंडूचे मळे फुलले...यंदा बाजारात दरही बहरणार; उत्पादकांना नवरात्रोत्सव पावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 1:45 PM

या फुलांचे धार्मिक महत्त्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे

सांगली : गणरायाने यंदा झेंडू उत्पादकांवर कृपादृष्टी दाखविल्यानंतर देवीचा नवरात्रोत्सवही पावणार आहे. पितृपक्षातच किलोला ४० रुपयांपेक्षा जास्त दर झेंडूला मिळाला असून, नवरात्रोत्सवात व दसऱ्याला चांगला दर मिळण्याची आशा आहे.कोरोना काळातही झेंडूला चांगला दर मिळाला होता. मागील वर्षी चांगला दर मिळाल्याने यंदा जिल्ह्यातील झेंडूचे उत्पादन वाढले आहे. नवरात्रोत्सवापूर्वी आता झेंडू फुलला असून, त्याची काढणी येत्या काही दिवसांत सुरू होईल. सांगली जिल्ह्यात विविध जातींच्या झेंडूचे उत्पादन केले जाते. जातीनुसार त्यांच्या उत्पादनाची क्षमता ठरलेली असते. तरीही यंदा सरासरी उत्पादन चांगले झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्या अपेक्षेने उत्पादन घेतले आहे त्या अपेक्षांची पूर्तता यंदाच्या दसऱ्याला होण्याची उत्पादकांना खात्री आहे.

तालुकानिहाय झेंडू क्षेत्र (हेक्टर)मिरज ५५वाळवा ६४शिराळा ३तासगाव ४२कडेगाव ६२खानापूर ८२आटपाडी ८०पलूस १५जत १०कवठेमहांकाळ १०एकूण ४२६ हेक्टर

खानापूर, आटपाडी अग्रेसर

झेंडूच्या उत्पादनात सध्या खानापूर व आटपाडी आघाडीवर असून त्याखालोखाल वाळवा, कडेगाव व मिरज तालुक्यांचा क्रमांक लागतो. दुष्काळी भागातील उत्पादकांनी यंदा उत्पादन वाढविले आहे.

किडीमुळे मोठे नुकसानयंदा शेतकऱ्यांना दर चांगला मिळण्याची अपेक्षा असतानाही किडीने नुकसान झाले आहे. झेंडूवर पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. किडीमुळे काही प्रमाणात उत्पादन घटले आहे.सणाचे व झेंडूचे महत्त्वझेंडूच्या फुलांना हिरण्यगर्भपुष्पही म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं. झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात. दोन ते तीन दिवस ती कोमेजत नाहीत. या फुलांचे धार्मिक महत्त्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे. संस्कृतमध्ये याला स्थूल पुष्प म्हणजेच दिव्य शक्तींसह सत्याचे प्रतीक मानले गेले आहे.

पितृपक्षातही सध्या दर चांगला आहे. गणेशोत्सवात अपेक्षेप्रमाणे चांगला दर मिळाला. दसऱ्यालाही यंदा चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी चांगला दर मिळाल्यामुळे लागवड क्षेत्र वाढले आहे.- आनंदा माळी, झेंडू उत्पादक

टॅग्स :SangliसांगलीFlowerफुलंNavratriनवरात्री