लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसहभागातून महापालिका क्षेत्र कचरामुक्त करता येऊ शकते. त्यासाठी नागरिकांना कचºयाचे वर्गीकरण करण्याची सवय लावण्याची गरज आहे. महापालिकेने योग्य नियोजन केल्यास केवळ दीड हजार कर्मचारी व सायकल घंटागाडीच्या जोरावर कचºयाची समस्या निकालात निघू शकते, असे मत तामिळनाडूच्या एमएलआरएम कंपनीचे संचालक श्रीनिवासन् चंद्रशेखरन् (वेल्लोर) यांनी व्यक्त केले.महापालिका व जिल्हा परिषदेच्यावतीने येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ‘घनकचरा व सांडपाणी संसाधन व्यवस्थापन’ या विषयावर दोनदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद््घाटन महापौर हारुण शिकलगार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी चंद्रशेखरन् बोलत होते. कर्नाटकातील उडपी, उत्तर प्रदेशातील अंबिकानगर, तामिळनाडूतील वेल्लोर या शहरात कचरा व्यवस्थापनाच्या यशस्वी प्रकल्पांचे प्रोजेक्टरद्वारे यावेळी सादरीकरण केले.चंद्रशेखरन् म्हणाले की, कचºयाचे १६९ प्रकारात वर्गीकरण करता येऊ शकते. त्यातून प्लॅस्टिक, खत निर्मितीसह विविध प्रकारचे घटक हे उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्यातून एकही घटक असा नाही, की जो वाया जाईल. त्यासाठी महापालिका क्षेत्रात पडिक असलेल्या इमारती, जागांचा वापर करून छोटे-छोटे कचरा वर्गीकरण प्रकल्प त्या-त्या भागात निर्माण करावेत. कचºयाचे वर्गीकरण करताना हॉटेल्स, व्यावसायिक कचरा एका वर्गात, नागरी कचरा एकीकडे आणि वैद्यकीय कचरा, असे वर्गीकरण करून त्यांचे नियोजन करावे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांकडून कचरा वर्गीकरण करण्यात यावे. एका रिक्षा घंटागाडी किंवा सायकल घंटागाडीद्वारे सुमारे २५० ते ३०० घरांचा कचरा ५ महिलांनी संकलित करायचा. त्याचे वर्गीकरणही त्याचपद्धतीने करायचे. एका घरामागे दररोज तीन रुपये खर्चातून हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो. त्यासाठी नागरिकांना ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी डबे द्यावे लागतील. ते सामाजिक संस्था व नगरसेवकांच्या निधीतून देता येतील, असेही ते म्हणाले.यावेळी उपायुक्त सुनील पवार, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, नगरसेवक संतोष पाटील, विष्णू माने, युवराज गायकवाड, पांडुरंग भिसे, पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये, डॉ. सुनील आंबोळे, डॉ. ऐनापुरे, डॉ. सुनील ताटे आदी यावेळी उपस्थित होते.कचरा डेपोवर पर्यटनस्थळसमडोळी रस्ता आणि बेडग रस्त्याच्या कचरा डेपोपैकी एक जागा तात्काळ आमच्या कंपनीच्या ताब्यात द्या. तेथील कचरा निर्मूलन चार महिन्यातच करून तेथे एका पर्यटन केंद्राप्रमाणे ही जागा विकसित करू. त्यानंतर दुसरा प्रकल्प ताब्यात द्यावा. लोकसहभाग, महापालिकेची यंत्रणा आणि बचत गटांच्या माध्यमातून हा प्रकल्प अठरा महिन्यांत यशस्वीपणे राबवू. प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर तो पुढे बचत गट आणि महापालिकेकडे हस्तांतरित करू, असेही चंद्रशेखरन् यांनी सांगितले.
पंधराशे कर्मचाºयांत शहर कचरामुक्त--श्रीनिवासन् चंद्रशेखरन्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:18 PM
सांगली : लोकसहभागातून महापालिका क्षेत्र कचरामुक्त करता येऊ शकते. त्यासाठी नागरिकांना कचºयाचे वर्गीकरण करण्याची सवय लावण्याची गरज आहे.
ठळक मुद्देमहापालिकेच्यावतीने कचरा व्यवस्थापन कार्यशाळा ‘घनकचरा व सांडपाणी संसाधन व्यवस्थापन’ या विषयावर